गुळखेडावाडी येथे विविध उपक्रम राबवून शिवजयंती साजरी
20-21 मुला मुलींनी भाषण स्पर्धात भाग
वर्ष 8
औसा प्रतिनिधी
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव निमीत्ताने आयोजित करण्यात आलेल्या गुळखेडावाडी येथील शिवजयंती समितीच्या वतीने शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून सामाजिक उपक्रम राबवून सध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली
सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळ्यानिमित्त गावचे गोपाळ यादव, सुभाष सिरसले, योगिराज भोसले,समाधान यादव, सोमनाथ सिरसले, नानासाहेब भोसले, पत्रकार विठ्ठल पांचाळ दयानंद भोसले,राम भोसले आदि मान्यवर यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भाषण स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये सर्व वयोगटातील जवळपास 20-21 मुलां-मुलीनी भाग घेतला होता. समितीच्या वतीने सर्व सहभागी स्पर्धकांना वह्या व पेन वाटप करण्यात आले यावेळी समितीच्या वतीने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राज्य स्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाल्या बदल विठ्ठल पांचाळ यांचा सत्कार शाल श्रीफळ पुष्पहार व महाराजांची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला. या वेळी शिव जयंती समितीचे पदाधिकारी प्रशांत यादव, लालासाहेब भोसले,सुरज सिरसले, योगेश यादव,विशाल भोसले , ज्ञानेश्वर भोसले, अभिजित भोसले , गोविंद दहीबाते, राम भोसले, दयानंद सिरसले, सोमनाथ भोसले, रमेश भोसले, महादेव यादव,अजित सिरसले, अण्णासाहेब भोसले,नामदेव भोसले, प्रशांत सिरसले, वैजिनाथ यादव,शुभम सिरसले, देवानंद भोसले,सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम भोसले यांनी केले तर सुत्रसंचलन रोहित सिरसले यांनी केले. तर आभार समाधान यादव यांनी मानले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.