राही फाऊंडेशन द्वारे सॅनिटायझर, स्टॅंड व मास्कचे वाटप
लातूर
शासनाच्या नियमानुसार इयत्ता 5वी ते 10 वी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लातूर येथील राही फाऊंडेशन द्वारे सामाजिक बांधिलकीची जाणिव ठेवून पटेलनगर येथील राजर्षी शाहू विद्यालय येथे सॅनिटायझर स्टॅंड, सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले . राही फाउंडेशनचे सचिव नागेश सुगरे यांनी राही फाऊंडेशनच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासंदर्भात हे आमचे पहिले पाऊल आहे, असे सांगितले .
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पवार मॅडम, प्रमुख पाहुण्या श्रीमती जाधव मॅडम, राही फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री एस. व्ही. नागुरे उपाध्यक्ष दीपक बजाज कोषाध्यक्ष शैलेश कानडे, सहसचिव पी. पी. झुंजे पाटील, सदस्य कुंभारे व्ही.व्ही. उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री बेलूरे सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री तोडकर सर यांनी केले .याप्रसंगी शाळेतील सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.