जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे यांना झालेल्या मारहाणीचा जाहीर निषेध
लातूर/प्रतिनिधी : लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा संपादक नरसिंह घोणे यांना दि.26 फेेब्रुवारी रोजी रात्री 12.30 च्या सुमारास त्याच्या गांधी चौक येथील कार्यालयात येऊन तु आमची बातमी का छापत नाहीस म्हणून धमकी देत हुज्जत घातली आणि मारहाण केली.याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान या घटनेतील मारहाण करणारे 2-3 जन जाणीवपूर्वक संपादकाच्या कार्यालयात आले आणि बातमी छापन्यावरून बाचाबाची करायला सुरूवात केली. रात्री उशीर झाल्याने पेपरचे पार्सल देण्यासाठी कार्यालयातील कर्मचारी कार्यालय बंद करून जात असताना मारहाण करणार्यापैकी एकाने त्यांच्या दुचाकीची चावी काढून नेली.त्याची मागणी करत असताना पुन्हा कार्यालयातील वाद काढून भर गांधी चौकात तिघांनी मिळून नरसिंह घोणे यांना जबर मारहाण कराण्यास सुरूवात केली.हा संपूर्ण प्रकार सुरू असताना सामाजिक कार्यकर्ते शंकर राजणकर चौकातून जात होते.त्यांनी हा प्रकार पाहताच मारहाण करणार्यांना पकडून थेट गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात दिले.त्यामुळे नरसिंह घोणे या घटनेतून बालंबाल बचावले.यानंरत त्यांना शासकीय रूग्णालयात नेले तेथून त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेचा लातूर जिल्ह्यातील पत्रकारांनी जाहीर निषेध केला असून याप्रकरणी मारहाण करणार्यावर कठोर कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.