*लातूर जिल्ह्यात औसा येथे पट्रोल डिझेल दरवाढ विरोधात शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन*
लातूर दि. देशात पेट्रोल डिझेल आणि गँस चे भाव अतिशय जलदगतीने वाढत आहेत.याला केंद्र सरकार जबाबदार आहे.
दर दिवशी होणारी दरवाढ ही सर्व सामान्य जनतेला परवडणारे नाहीत. नागरिक कंटाळून गेले आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात जनतेमध्ये रोष पसरला आहे. दिल्लीत शेतकरी बांधव आपल्या हक्कासाठी लढत आहेत त्यांना सुद्धा न्याय मिळत नाही. या सर्व बाबींना केंद्र सरकारच जबाबदार आहे. म्हणून आज केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली केले यावेळी औसा शिव सेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, तालुका प्रमुख सतीश शिंदे , शहर प्रमुख सुरेश भुरे, महिला आघाडी जयश्री ताई उटगे, माजी नगर सेवक बंडू कोद्रे , खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, तालुका संघटक रोहित गोमदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, उपतालुका प्रमुख केरबा एकंबे, किशोर भोसले, गणेश गायकवाड, विलास शिंदे, ईश्वर वाघे, प्रवीण कोव्हळे, प्रवीण बालगीर, सचिन सगर, राहुल मोरे, वैभव मोरे, विजय पवार, राहुल मातोळकर, अमोल सूर्यवंशी, मनोज सोमवंशी, संजय साठे, गोविंद खंडागळे, शंकर लंगर, श्रीहरी काळे, राजाभाऊ भणगे, श्रीधर साळुंके, बजरंग माने, अरुण देवकते, अजीत भोसले बाळासाहेब नरवडे, आकाश माने, शुभम भालके, आकाश फुलारी, केशव डांगे आदी उपस्थिती होते
केंद्र सरकार मधील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आज औसा येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले आहे. याची केंद्र सरकारनी दखल घ्यावी. अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांनी माध्यमाशी बोलताना दिला
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.