पालकमंत्री पाणंद रस्ते कामाचा 28 मार्च रोजी शुभारंभ

                                                

पालकमंत्री पाणंद रस्ते कामाचा

28 मार्च  रोजी शुभारंभ





लातूर,दि.26 (जिमाका): राज्य शासनाने उदगीर व जळकोट तालुक्यासाठी पालकमंत्री पाणंद रस्ता या योजनेसाठी पाच कोटीचा निधी मंजूर केला आहे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वाहतुकीस उपयोगी असलेल्या या योजनेतून उदगीर व जळकोट तालुक्यातील जवळपास सत्तर ते ऐंशी गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून  या कामाचा शुभारंभ  28 मार्च 2021 रोजी होणार आहे. 

 या योजनेत येणाऱ्या तालुक्यातील  प्रत्येक गावात कामाची प्रत्यक्ष  सुरुवात होणार आहे. प्रत्येक गावातील प्रथम  रस्त्याचे माती काम करण्यात येणार असून नंतर च्या काळात या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या