उदगीर शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी 48 लाखाचा निधी मंजूर


उदगीर शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी


48 लाखाचा निधी मंजूर





लातूर,दि.26 (जिमाका): उदगीर शहर व परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवण्यासाठी राज्य शासनाने 48 लाखाचा निधी मंजूर केला आहे.सदरील हा निधी  नागरी दलित्तोर   योजनेतून मंजूर करण्यात आला असल्याची  माहिती राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.


            उदगीर शहर व परिसरात अनेक दिवसापासून सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही बसवण्यात यावे अशी मागणी व्यापारी व नागरिकांची होती यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आला होता.  व्यापारी,ज्येष्ठ नागरिक, तसेच  महिला वर्गाच्या सुरक्षेसाठी शहरातील महत्त्वाच्या  ठिकाणी सीसीटीव्ही   बसविणे गरजेचे होते.


****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या