राज्यस्तरीय *शाळास्नेही बालरक्षक* पुरस्कार नजीऊल्ला शेख यांना जाहीर...
===================
लातूर,दि.२६- मुंबई येथील बालरक्षक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय शाळास्नेही बालरक्षक सन्मान पुरस्कार जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा,नांदगाव ता.लातूर येथील उपक्रमशिल शिक्षक तथा बालरक्षक नजीऊल्ला शेख यांना जाहिर झाला आहे. दिनांक ०३ एप्रिल २०२१ रोजी मुंबई येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे.
आजपर्यंत सुमारे १५ शाळाबाह्य बालकांना त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.एवढेच नव्हे तर विशेष गरजाधिष्ठित बालक-पालक यांना समुपदेशनपर प्रोत्साहन देवून त्यांना आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचे काम केले आहे.त्याचबरोबर राज्यस्तरीय बालरक्षक कार्यशाळेतील विविध टास्क वेळेवर पूर्ण केले आहेत.राज्यस्तरावरील बालरक्षक मेळाव्यात लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले आहे व संवेदनशिलतेने काम करणारा प्रत्येक व्यक्ती हा बालरक्षकच असतो यावर ठाम विश्वास ठेवून त्यांनी विभागस्तरावर आयोजीत बालरक्षकांच्या कार्यशाळेत सुलभक म्हणून यशस्वी कार्य केले आहे.त्याचबरोबर शाळाबाह्य बालकांच्या जीवनावर अनेक केसस्टडींचे लेखन करून त्या राज्यस्तरावर विचारार्थ पाठवल्या आहेत.त्यांनी शाळाबाह्य मूलांसाठीच्या अविरत केलेल्या या कार्याची योग्य दखल बालरक्षक प्रतिष्ठाणने घेवून त्यांची या राज्यस्तरीय शाळास्नेही बालरक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षणाधिकारी (प्राथ.) विशाल दशवंत,प्राचार्य अनिल मुरकुटे,
गटशिक्षणाधिकारी धनराज गिते,जिल्हा समन्वयक चंद्रकांत ठाकरे,केंद्रप्रमुख बालाजी कोळी,मुख्याध्यापक सोनाजी भंडारे यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.