लातूर ते बार्शी रोडवर अपघात एक ठार

 :लातूर ते बार्शी रोडवर साखरा पाटी जवळील अपघात:एक ठार 

लातूर प्रतिनिधी









दि.26/03/21 रोजी दुपारी 4.0 वा. आयशर टेम्पो  क्र. MH 04-GC-2249 हा  मुरुड कडून लातूर कडे  व छोटा हत्ती क्र.MH 12-JF-5503 हा लातूर कडून मुरुड कडे जात असताना साखरा पाटी जवळ वळण रस्त्याचे ठिकाणी त्यांची ड्रायव्हर साईडने समोरा समोर धडक बसून अपघात झाला आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी पो.स्टे. गातेगाव येथील सपोनि व्ही. एस.नवले पोलीस कर्मचारी पांडुरंग दाडगे, बाबुराव डापकर, जि. एल.गिरी असे पोहोचून पोलीस व नागरिक यांचे मदतीने अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना तात्काळ सरकारी दवाखाना लातूर येथे पाठविण्यात आले. अपघातामध्ये आयशर टेम्पो चालक धनराज बब्रुवान मोठे वय 40 वर्ष, राहणार चिंचोली (माळी)ता.केज जि.बीड हे जागीच मरण पावले, व छोटा हत्ती चा चालक नितीन संपत कांबळे वय 30 वर्ष व सोबत असलेला अक्षय काशिनाथ कांबळे वय 28 वर्ष दोघे रा. बोरगाव काळे ता.जि. लातूर हे गंभीर जखमी झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या