*दरोड्यातील 6 आरोपींना मुद्देमालासह 12 तासाच्या आत पोलिसांनी घेतले
चाकूर
श्री. विद्याधर काळे उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर आनंतपाळ पोलीस पथकाने मौजे निटूर येथे रस्त्यावरील लोकांना अडवून हत्याराचा धाक दाखवून असं काय दरोडा टाकणाऱ्या आरोपीना मुद्देमालासह 12 तासाच्या आत ताब्यात घेतली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी नामे प्रदीप माधव कदम वय- 21 वर्षे, राहणार हनुमंतवाडी हे दिनांक 30/03/2021 रोजी 2100 वाजण्याच्या सुमारास त्यांचे मोटरसायकल वरून लातूर येथून हनुमंतवाडी कडे जात असताना अज्ञात आरोपीतानी मौजे हनुमंतवाडी जवळ रस्त्यावर फिर्यादीची मोटरसायकल अडवून त्यांच्याकडील धारदार शस्त्र लावून त्याचे कडील रोख रक्कम 1500 रुपये व 1 विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 15,500/- रुपयाचा माल जबरीने चोरला वगैरे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे शिरूर आनंतपाळ येथे गुन्हा रजिस्टर नंबर 73/2021 कलम 395 भा. द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस अधीक्षक श्री.निखील पिंगळे व श्री. हिंमत जाधव,अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळाला भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टिकोनातून मार्गदर्शन करून वेगवेगळी पथके तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याचे सूचना करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने श्री.विद्यानंद काळे उपविभागीय पोलिस अधिकारी,चाकूर यांनी पोलिस ठाणे शिरूर अनंतपाळ पोलिसांचे वेगवेगळे पथक नेमून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली
दिनांक 30/03/ 2021 रोजी श्री कदम पोलीस निरीक्षक पोस्टे शिरूर अनंतपाळ व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळालेल्या माहिती नुसार इसम नामे ऋषिकेश बाळू शेवाळे, राहणार हडपसर पुणे यास मौजे दापका येथून गावकऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडे जबरी चोरीबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की,त्याचे साथीदार 1) राजकुमार नागनाथ पवार राहणार-लांबोटा तालुका निलंगा सध्या राहणार पुणे 2)शुभम गायकवाड राहणार पुणे 3)सुनील अरविंद मोरे राहणार लांबोटा ता. निलंगा 4)अशोक तुकाराम शिंदे राहणार पुणे 5)नागेश गोपाळ निलेवाड ,राहणार पुणे असे आम्ही सर्वजण मिळून जबरी चोरी केल्याची कबुली दिली.
सदर आरोपीताकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता अशी माहिती मिळाली की, जेव्हा केव्हा सदर आरोपीताना पैशाची गरज पडते तेव्हा तेव्हा सदरचे आरोपी सामूहिकरीत्या अशा प्रकारचे गुन्हे करतात.
सदर आरोपीतांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले धारदार कत्ती, विवो कंपनीचा मोबाइल व पैसे जप्त करण्यात आले आहे. तसेच नमूद आरोपीतानी पोलीस ठाणे निलंगा हद्दीमध्ये पण अशाच प्रकारचा गुन्हा केला असून पोलीस ठाणे निलंगा येथे सदर आरोपीतांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय नमूद आरोपीतानी इतर ठिकाणीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत काय ? याबाबतचा पोलीस अधिक तपास करीत आहे.
सदर कामगिरी श्री. निखील पिंगळे पोलीस अधीक्षक लातूर श्री. हिंमत जाधव अपर पोलीस अधीक्षक लातूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विद्यानंद काळे उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर श्री. कदम पोलीस निरीक्षक श्री. स्वामी पोलीस उपनिरीक्षक ,पोलीस अंमलदार सत्यवान कांबळे, विठ्ठल साठे, लतीफ सौदागर यांनी केली आहे.
लातूर रिपोर्टर के लिए अहमदपुर. उदगीर जलकोट देवणी निलंगा रेणापुर किल्लारी उजनी के लिए रिपोर्टर नियुक्त करना है इच्छुक अपना biodata laturreporter2012@gmail. Com पर मेल करें
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.