उदगीर मतदारसंघातील विकास कामासाठी अर्थसंकल्पात 74 कोटीच्या तरतुदीस मान्यता

 

उदगीर मतदारसंघातील विकास कामासाठी अर्थसंकल्पात

74 कोटीच्या तरतुदीस मान्यता

                                                   - राज्यमंत्री सजंय बनसोडे






 मुंबई, दि.9:-जिलह्यातील उदगीर-जळकोट मतदारसंघातील विकास कामासाठी राज्य शासनाने सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात सुमारे 74 कोटीची अर्थिक तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे.यामध्ये उदगीर बनशेळकी उड्डानपुल, शिरुर ताजबंद ते उदगीर रस्ता व अन्य कामाचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

 सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील राज्याचा अर्थसंकल्प आज विधानभवनात सादर करण्यात आला.  या अर्थसंकल्पात उदगीर मतदार संघाच्या विकासाला शासनाने भरीव अशी अर्थिक तरतुद केली आहे.  उदगीर येथील बनशेळकी उड्डानपुलासाठी ३५ कोटी   उदगीर शिरुर ताजबंद रस्ता २२ कोटी  बांधकाम विभागाचे कार्यालय बांधकामास ६.७५ कोटी, वाढवणा गुडसुर अतनुर रस्ता ३. ०५ कोटी, कुमठा भाकसखेडा पोचमार्गासह पुलाचे बांधकाम या साठी सुमारे ९ . ५० कोटीची तरतुद करण्यात आली आहे.

   मतदार संघातील विविध विकास कामासाठी 74 कोटीची तरतुदीस या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

                                             ***


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या