*राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद दिल्ली तर्फे आयोजित उर्दू बाल साहित्यवर आधारित एक दिवसीय चर्चासत्र व कार्यशाळा*
राष्ट्रीय स्तरावर 80 निबंध लेखकांनी सहभाग घेऊन केलं प्रकाशन
औसा मुखतार मणियार
राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद दिल्ली व औसाफ चारीटेबल ट्रस्ट लातूर च्या वतीने औसा शहर मध्ये गार्डन फंक्शन हॉल येथे *वैश्विक सद्य स्थितीत व उर्दू बाल साहित्य निर्मिती* शीर्षकावर आधारित एक दिवसीय परिसंवाद व कार्यशाळेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. परिसंवाद कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शेख रहिमोद्दिन साहेब तसेच प्रमुख अतिथी श्रीमती भंडारी मॅडम गट शिक्षणाधिकारी तालुका औसा, जावेद अख्तर मालेगाव, मुंबईहून उर्दू आंगण मासिकाचे मुख्य संपादक मुशिर अन्सारी साहेब, लेखक संपादक अश्फाक उमर साहेब मालेगाव, तसेच विद्या प्राधिकरण पुणे येथील अधिव्याख्याते व महाराष्ट्रात आपल्या शैक्षणिक कामाबद्दल ओळख निर्माण करणारे मलिक निजामी सर होते.
बालसाहित्य वर आधारीत पहिल्या लेखन चर्चासत्रचे मलिक निजामी यांचे अध्यक्षते खाली डॉ फय्याज नदाफ उदगीर, डॉ अब्दुल राफे नांदेड, शबनम आपी उस्मानाबाद आदींनी आपले प्रस्तुतिकरन केले तर दुसऱ्या सत्रची अध्यक्षता विज्ञान बालसाहित्यीयीक डॉ रफिउद्दिन नासर ह्यांनी केली लेखक गुलाम जावेद हिंगोली, डॉ शाह ताज मॅडम पुणे, सिराजुद्दिन हैद्राबाद आदिंनी आपले प्रस्तुतीकरन केले.शेवटच्या सत्रात ज्याची अध्यक्षता मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रहिमुद्दिन ह्यांनी भावी साहित्य वाचक हे बालसाहित्यातुन निर्माण होतील असे मत व्यक्त केले तर प्रमूख पाहुणे भंडारी मॅडम ह्यांनी बाल साहित्य फक्त कविता व गोष्टी पूर्ता मर्यादीत नसावा असे सांगितले. उर्दू बाल साहित्यवर आधारीत राष्ट्रिय स्तरावरील 80 लेखकांच्या लेखनावर आधारीत जगाची सद्य स्थिती व उर्दू बाल साहित्य ह्या पुस्तक बरोबर सहा पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. आभार प्रदर्शन म. मुस्लिम कबीर ह्यांनी व सर्व कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ खलील सिद्दीकी ह्यांनी केले.या वेळी शिक्षक शिक्षिका पत्रकार उपस्थिति होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.