आज नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक मा.श्री निसारजी तांबोळी साहेब
यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे
वृक्षारोपण करण्यात आले.
यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे
वृक्षारोपण करण्यात आले.
ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक कार्यालयात १५२६ शोभिवंत झाडे लावण्यात आली आहेत. गुलाब, लिली, टीकोमा, मोगरा, चाफा, कनेरी, टरमेनेलिया या शोभिवंत व फुलांच्या झाडांचे रोपण करण्यात आले.
या सर्व झाडांची पाहणी करून श्री निसारजी तांबोळी यांनी ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या कार्याचे कौतूक करून शुभेच्छा दिल्या. झाडांचे संगोपन करा, झाडे जगवा असे आवाहनही यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री निसार तांबोळी यांनी केले. लातूर परिसरात हरित आच्छादन वाढविणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री निखीलजी पिंगळे, पोलीस उपअधीक्षक श्री हिम्मत जाधव, पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलिस निरीक्षक श्री गजानन भातलोंढे, ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, मनपा नगरसेवक इम्रान सय्यद, ऍड वैशाली लोंढे-यादव, ऋषिकेश दरेकर, मनमोहन डागा, विजयकुमार कठारे, शिवशंकर सुफलकर, मोईझ मिर्झा, प्रिया नाईक, महेश गेलडा, शुभम आवाड हे उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.