*तपसे चिंचोली येथे जागतिक जल दिन साजरा*
औसा प्रतिनिधी:-
औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे एस बी आय फौंडेशन मुंबई व जनविकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसेवा कार्यक्रम अंतर्गत २२ मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कृषी सहाय्यक वाघमारे यांनी ग्रामस्थांना पाण्याचे मानवी जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. आगामी काळातील पाण्याचे संकट टाळण्यासाठी काय केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी पाणी फौंडेशनचे प्रतिनिधी देविदास पवार यांनी गावातील युवकांना पाण्याचे व्यवस्थापन करण्याबाबत योग्य मार्गदर्शन,पाण्याची बचत करण्याबाबत कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात ,पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जलसंधारणाचे कामे करून पाण्याचा योग्य वापर कसा करावा ,गावातील युवकांच्या श्रमदानातून जमिनीची पाणी पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे हे सांगितले. याप्रसंगी जलदिनाच्या निमित्ताने उपस्थितांच्या वतीने पाणी बचतीबाबत संकल्प करण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी व्ही डी जोशी ,सरपंच विश्वंभर सुरवसे,उपसरपंच युवराज यादव ,ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कांबळे, दिलासा प्रतिनिधी बापू कदम,राजेश पाटील , दत्ता शिवरे, शिव सेलूकर,दिगंबर मुळे, अमोल तुगावे,शिवदास स्वामी,प्रशांत नेटके उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माकर तौर व आभार राहुल घुळे यांनी मांडले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.