महाराष्ट्र विद्यालयाला निबंध स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उपक्रम ः आरोग्य उपसंचालक माले यांच्याहस्ते सन्मानीत
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उपक्रम ः आरोग्य उपसंचालक माले यांच्याहस्ते सन्मानीत
लातूर दि.24/3/2021
मानवी आरोग्याचे संरक्षण व संवर्धन करतानाच व्यसनमुक्त भारत घडवण्याच्या उद्दीष्टपूर्तीसाठी महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या शालेय स्थरावरील निबंध स्पर्धेत जे.एस.पी.एम. संचलित मजगे नगर येथील महाराष्ट्र विद्यालयातील शिक्षक प्रतिनिधी, विध्यार्थी यांना आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथराव माले आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देशमुख यांच्याहस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन आरोग्य विभागाच्यावतीने सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत, रत्नपारखे प्रेरणा(प्रथम),पाटील राधिका (द्वितीय),काळे भक्ती(तृतीय),तर कावळे सिद्धीका या विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळविली. या प्रसंगी बोलताना डॉ.माले यांनी स्पर्धेत सहभागी सर्व शाळा आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भविष्यात शाळा, समाज ,शिक्षक, पालक व आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून तंबाखूमुक्त भारत बनवण्यासाठी प्रयत्न करण्याचे व्यापक नियोजन करून जनप्रबोधन करू असे सांगितले.डॉ.देशमुख यांनीही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.शाळेतील यशस्वी विध्यार्थ्यांना प्राचार्य गोविंद शिंदे यांनी मार्गदर्शन केले होते. आरोग्य उपसंचालक कार्यालयात कोरोनाचे नियम पाळून झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात शाळा प्रतिनिधी म्हणून अब्दुल गालिब शेख यांनी पारितोषिक स्वीकारले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, संस्थेच्या सचिव तथा जि.प.च्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, कार्यकारी संचालक मा.रणजितसिंह पाटील कव्हेकर, समन्वयक- संचालक मा.निळकंठराव पवार, शैक्षणिक संचालक संभाजीराव पाटील, समन्वयक बापूसाहेब गोरे, समन्वयक विनोद जाधव, प्राचार्य गोविंद शिंदे, मुख्याध्यापक संजय बिरादार, उप.मु.अ- अनिल सोमवंशी, अब्दुल गालिब शेख, आर्य आदींसह सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.