मी पाहिलेले प्रशासकीय सेवेतील " रहीम "..
................................................
तारीफ़ के मोहताज नहीं होते सच्चे लोग , क्यु की असली फूलों पर कभी इत्र नहीं लगाया जा सकता.... तरी पण...
गेल्या २४ वर्षांपासून आरोग्य विभागात तालुका आरोग्य अधिकारी तथा जिल्हा हिवताप अधिकारी म्हणून काम पहात असलेले डॉ आर आर शेख यांनी आपल्या प्रशासकीय सेवेतील रौप्यमहोत्सवी वर्षात नुकतेच पदार्पन केले असून वैयक्तिक माझा आणि त्यांचा संबंध तसा फार जवळचा नाही , परंतु माझ्या पत्रकारितेच्या २५ वर्षात दहा पाच वेळा गाव आणि परिसरातील आरोग्य प्रश्र्नांबद्दल फोन पे चर्चा करण्याचा व क्वचित भेट घेण्याचा योग आला आहे. अतिशय मितभाषी , गुणी आणि कर्तव्य तत्परता अंगी असलेल्या डॉ आर आर शेख यांना जेंव्हा कधी भेटण्याचा योग आला तेंव्हा ते एक अधिकारी आहेत असे कधी वाटलेच नाही. प्रश्र्न तिथे फक्त उत्तर नव्हे तर त्याचे समाधान करण्यावर त्यांचा भर नेहमी अनुभवायला मिळाला.आरोग्य विषयावर अडचण कोणतीही असो ती तत्परतेने सोडविण्यासाठी त्यांचे प्रयत्न प्रामाणिक राहिले असून समन्वयाने काम करण्याची त्यांची पध्दत वाखाणण्याजोगी आहे.
फेब्रुवारी महिन्यातील २४ तारखेला त्यांच्या प्रशासकीय सेवेला २४ वर्षं पुर्ण झाले असून सेवेच्या २५ व्या म्हणजे रौप्यमहोत्सवी वर्षात त्यांनी पदार्पन केले आहे , यानिमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा.. आणि शेवटी एवढंच म्हणेन...मेहनत से पायी सफलता की आपको दिल से बधाई है.
किशोर जोशी
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.