निम्न तेरणा च्या कामासाठी आ.अभिमन्यू पवार यांनी घेतली जलसंपदा मंत्र्यांची भेट.
जलसंपदामंत्र्याचे सिंचनाच्या कार्यकारी संचालक व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
औसा - राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची आ. अभिमन्यू पवार यांनी भेट घेवून माकणी ते औरद शहाजनी निम्न तेरणा नदी पात्राच्या खोलीकरण व रुंदीकरण कामास परवानगी द्यावी.तेरणा प्रकल्पातील गाळाचे सर्वेक्षण व तेरणा च्या उजव्या कालव्यामुळे खंडित झालेल्या कोकळगाव - सरवडी रस्ता कामास मंजुरी द्यावी आदी मागण्या केल्या.
या भेटी दरम्यान आ. अभिमन्यू पवार यांनी जलसंपदा मंत्री यांच्याशी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली असून माकणी ते औरद शहाजनी या तेरणा पात्रातील अंदाजे ४० किलोमीटर लांबीच्या खोलीकरण व रुंदीकरण कामासाठी श्री.श्री.रविशंकर यांचे आर्ट ऑफ लिव्हिंग, भारतीय जैन संघटना व नाम फाऊंडेशन यांच्याकडून पोकलेन, जेसीबी उपलब्ध करुन देण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनी मशिनरी देण्याची तयारी दर्शविली आहे. तर या कामाला जिल्हा वार्षिक योजनेतून किंवा इतर योजनेतून इंधनखर्चासाठी निधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती आ. अभिमन्यू पवार यांनी यावेळी केली.या बरोबर निम्न तेरणा प्रकल्पातील गाळाचे सर्वेक्षण २००३ मध्ये झाले होते.यानंतर गाळ उपसा झाला नाही.यामुळे पुनसर्वेक्षण करण्यात यावे.गाळ साठल्याने प्रकल्पाची साठवण क्षमता २ टीएमसीने कमी झाला आहे.व हक्काचे पाणी कर्नाटक राज्यात वाहून जात आहे हि बाब आ. पवार यांनी जलसंपदा मंत्री यांच्या निर्देशानास आणून दिली.
तेरणा च्या उजव्या कालव्यामुळे कोकळगाव - सरवडी रस्ता खंडित झाला असून मागच्या २५ वर्षांपासून परिसरातील शेतकऱ्यांना १ किमी अंतरासाठी वळसा घालून ६ किमी अंतर पार करावे लागत आहे.दरवर्षी उन्हाळ्यातच सोयाबीनच्या राशी होत असल्याने आर्थिक नुकसानही सोसावे लागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देत कालव्याखालून बोगदा तयार करून किंवा कालव्याच्या दोन्ही बाजूंनी नजीकच्या गाडीरस्त्यावर भराव टाकून पूलापर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करून द्यावा अशीही मागणी आ. अभिमन्यू पवार यांनी केली . या सर्व मागणीवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावे असे निर्देश सिंचन विभागाचे कार्यकारी संचालक व लातूरचे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.