आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी
अन्नत्याग आणि पदयात्रा
आंबाजोगाई/प्रतिनिधी: आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी
औंढा नागनाथ ते चिलगव्हाण अशी १२५ किमीची पदयात्रा करण्याचा निर्धार डॉ.राजीव बसरगेकर, रामकिसन रुद्राक्ष,सुभाष कच्छवे आदींनी व्यक्त केला आहे.
ही शेतकरी सहवेदना यात्रा ११ मार्च रोजी औंढा नागनाथ येथून निघेल व ती १९ मार्च रोजी चिलगव्हाण येथे पोहोचणार आहे.
नऊ दिवसांची ही पदयात्रा अनेक गावातून जाणार आहेत.दिग्रस कऱ्हाळे, हिंगोली, खानापूर, कळमनुरी, मालेगाव, बाभळी, शेंबाळ पिंपरी, मुळावा, पळशी, कृषी महाविद्यालय मरसुळ, उमरखेड, सुकळी, नांदगव्हाण, बिजोरा, मुडाना, महागाव, चिलगव्हाण या मार्गाने ही पदयात्रा जाणार आहे.
कोरोना बाबतचे सर्व निकष या यात्रेत पाळले जातील,असे सांगून या यात्रेकरूंनी सांगितले की,हा आमचा व्यक्तिगत निर्णय आहे.अन्य यात्रेकरूही आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर या यात्रेत सहभागी होऊ शकतात.
चिलगव्हाण येथे अन्नत्याग...
अमर हबीब आणि अनंत देशपांडे हे या वर्षी चिलगव्हाण येथे अन्नत्याग (उपवास) करणार आहेत. त्यांनी सांगितले की, गतवर्षी त्यांनी पुण्यात फुलेवाड्याला भेट देऊन बालगंधर्व समोर लहान-लहान गटात बसून अन्नत्याग केला होता.त्याच प्रमाणे यावर्षी चिलगव्हाण येथे अन्नत्याग (उपवास) करणार आहेत. २०१७ मध्ये त्यांनी चिलगव्हाणला भेट देऊन महागाव येथे उपोषण केले होते.चिलगव्हाण हे साहेबराव करपे यांचे गाव आहे
१९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे यांच्या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली होती.आत्महत्या केलेल्या तमाम शेतकाऱ्याना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे समाजाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी १९ मार्च रोजी लाखो संवेदनशील नागरिक एक दिवस अन्नत्याग करतात.यावर्षीही हजाराहून अधिक शेतकाऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला.म्हणून यावर्षी नागरिकांनी अन्नत्याग करून आपल्या भावना व्यक्त कराव्या,असे आवाहन अमर हबीब यांनी केले आहे.हा कार्यक्रम कोण्या पक्ष वा संघटनेचा नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.