काँग्रेस पक्षाच्या औसा माध्यम मीडिया सेलचे तालुका अध्यक्ष म्हणून विठ्ठल पांचाळ यांची निवड
*जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी यांची माहिती*
औसा प्रतिनिधी
*जिल्ह्यातील कॉँग्रेस पक्षाचे संघटन वाढवणे त्याचा प्रसार प्रचार आणि ग्रामीण भागात राज्य सरकारच्या ज्या विकासाच्या योजना राबविल्या जातात त्या लोकापर्यंत पोहचवण्यासाठी माध्यम मीडिया आवश्यक असते त्यादृष्टीने लातूर जिल्हा काँग्रेस माध्यम मीडिया सेल ने रविवारी जिल्यातील १० तालुक्यांतील नूतन तालुका काँग्रेस माध्यम मीडिया सेल च्या अध्यक्षाची निवडी जाहिर केल्या आहेत
राज्याचे वैद्यकिय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या सूचनेनुसार जिल्हा कॉंग्रेसचे माध्यम मीडिया सेल चे जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी यांनी तालुका कॉंग्रेस माध्यम मीडिया सेल अध्यक्ष यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत
नूतन काँग्रेस माध्यम मीडिया सेलचे औसा तालुका अध्यक्ष म्हणून विठ्ठल पांचाळ यांची निवड करण्यात आली असल्याचे हरिराम कुलकर्णी यांनी कळवले आहे
जिल्ह्यातील नवनिर्वाचित तालुका काँग्रेस माध्यम मीडिया सेल नूतन अध्यक्षाचे राज्याचे वैधकिय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, आमदार धीरज देशमुख जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या असून सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.