खाजगी क्लासेस, वसतिगृहातील विद्यार्थ्यांची तसेच भाजी विक्रेतेच्या केल्या जात आहेत कोरोना चाचणी
सुपर स्प्रेडरच्या चाचण्यांवर लातूर महापालिकेचा भर
लातूर/ प्रतिनिधी:शहरातील खाजगी क्लासेस व वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यासाठी पालिकेचे स्वतंत्र केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे. याशिवाय भाजी विक्रेते, सुपर मार्केट कर्मचारी अशा सुपर स्प्रेडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विविध घटकांच्या कोरोना चाचण्या पालिकेकडून वेगाने केल्या जात आहेत.
मागील काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याचे दिसत आहे. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी लातूर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सक्रिय झाला आहे. त्यासाठी विविध घटकांच्या चाचण्यांवर भर दिला जात आहे.
खाजगी क्लासेस परिसरात विविध क्लासेस आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या तपासण्या करण्यासाठी अष्टविनायक मंदिर नाजिक गणेश हॉल येथे तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी ४६२ विद्यार्थ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. यात २ विद्यार्थ्यांना बाधित आढळले. क्लासेस बंद असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या तपासण्या झालेल्या नाहीत. क्लासेस चालक आणि वसतिगृह संचालकांनी आपल्याकडील सर्व विद्यार्थ्यांच्या तपासण्या या केंद्रावरून करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सुपर स्प्रेडर गटातील घटकांच्याही चाचण्या गतीने सुरू आहेत. महापालिकेने शनिवारी (दि.६ मार्च)राजीव गांधी चौक परिसरातील भाजी विक्रेते तसेच औसा रस्त्यावरील विश्व सुपर मार्केट, प्रमोद सुपर मार्केट, रिलायन्स मार्ट, गोदावरी यासह विविध आस्थापनातील कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या केल्या. एकूण १८३ तपासण्या झाल्या. यात एकजण बाधित सापडला. त्यास आवश्यक उपचार दिले जात आहेत.
रविवारीही अशा पद्धतीने चाचण्या सुरू होत्या. दयानंद गेट परिसरात असणाऱ्या भाजी विक्रेत्यांच्याही चाचण्या सुरू आहेत.
याशिवाय डी मार्ट व अंबाजोगाई रस्त्यावरील विश्व सुपर मार्केट आणि इतरही ठिकाणी पालिकेच्या पथकांनी कोरोना चाचण्या केल्या. रविवारी झालेल्या १०२ चाचण्यात २ व्यक्ती बाधित आढळल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.
यासाठी महानगरपालिकेच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधा राजूरकर यांच्या अधिपत्याखाली चाचणी पथक गठित करण्यात आले आहे.
या पथकांमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ रवीकुमार जाधव, गजानन पाटील, स्वाती सदानंदे, वाजेद सय्यद, रवींद्र धानोरकर, स्वप्निल जाधव, प्रियंका झुंजे यांच्यासह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
लातूर शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी पालिका कटिबद्ध आहे. यासाठी चाचण्या केल्या जात असून त्यासाठी विविध पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पालिकेच्या वतीने शहरात विविध ५ ठिकाणी चाचणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. कव्हा रस्त्यावरील समाजकल्याण विभागाचे वसतीगृह, औसा रस्त्यावर पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन व वसतीगृह, मनपा रुग्णालय,
पटेल चौक, इंडियानगर प्राथमिक आरोग्य केंद्र व गणेश हॉल,
अष्टविनायक मंदिरजवळ अशी ही ५ चाचणी केंद्र आहेत.
पालिकेच्या वतीने ठिकठिकाणी जाऊन तपासण्या केल्या जात आहेत. तरीही व्यापारी,
व्यावसायिक, नागरिक यांनी आपल्याकडील कर्मचाऱ्यांच्या तसेच खाजगी क्लासेसचे संचालक यांनी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करून घ्याव्यात. यासाठी आपल्या नजिकच्या तपासणी केंद्राशी संपर्क साधावा. व्यावसायिक व दुकानदारांनी आपल्या दुकानात हॅण्ड सॅनिटायझर ठेवावे. मास्क घातल्याशिवाय ग्राहकांना दुकानात प्रवेश देवू नये. शारीरिक अंतर राखण्यासाठी उपाययोजना कराव्यात,असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे,
उपमहापौर चंद्रकांत बिराजदार,आयुक्त अमन मित्तल, आरोग्य अधिकारी डॉ महेश पाटील यांनी केले आहे.
चौकट १
मनपाचे ५ कोरोना चाचणी केंद्र.
लातूर महापालिकेच्या वतीने शहरात विविध ५ ठिकाणी चाचणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. कव्हा रस्त्यावरील समाजकल्याण विभागाचे वसतीगृह, औसा रस्त्यावर पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन व वसतीगृह, मनपा रुग्णालय,
पटेल चौक, इंडियानगर प्राथमिक आरोग्य केंद्र व गणेश हॉल,
अष्टविनायक मंदिरजवळ अशी ही ५ चाचणी केंद्र आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.