स्त्री जन्मा तुझी ही करूण कहाणी ओठावर हसू आणि डोळ्यांमध्ये पाणी या उक्तीप्रमाणे आजच्या स्थितीतही काही महिलांची करूण कहाणी असलेली समाजात दिसून येत आहे. पुर्वीच्या काळातील आणि आजच्या काळातील स्त्रीयांची स्थिती बदललेली असली तरी भय इथले अजून संपत नाही अशीच स्थिती उभी आहे.सामाजिक, राजकीय क्षेत्रात महिलांचा सक्रीय सहभाग हे त्याचे द्योतक आहे परंतु अजूनही ग्रामीण भागातील स्त्रीयांचे प्रश्न खूप जटील आहेत अजूनही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अबला म्हणूनच पाहण्याजोगा आहे परंतु हे सर्व असले तरी स्त्रीयांनी आता अबला न राहता सबला झाले पाहिजे ती काळाची गरज आहे प्रत्येक स्त्री ही या सृष्टीची निर्माती आहे हे तिने ओळखले पाहिजे स्वतःचे आगळेवेगळे अस्तित्व उभे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न महिलांनी करायला हवा विचाराला कृतीची जोड देऊन स्वतःकडे असलेल्या विचारांच्या जोरावर आपले अस्तित्व, कर्तृत्व, नेतृत्व उभे करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.महिलांनी सामाजिक क्षेत्रात येऊन महिलांच्या प्रश्नांचा आवाज बुलंद व निर्भीड केला तरच तिच्यावरील असलेला अबला नावाचा संकोच दूर होऊन सबला स्त्री म्हणून तिचे अस्तित्व उभे होईल कुठल्याही संकटांना, अडचणींना न डगमगता मार्गक्रमण केले तर यशाचे शिखर नक्कीच स्त्री गाठेल हा मला आत्मविश्वास आहे कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा झाली त्या बिकट स्थितीलाही महिलांनी अतिशय सामर्थ्याने तोंड दिले ही एक विलक्षणीय बाब आहे. शेतकरी शेतमजूर महिला आजही काबाड कष्ट करून स्वतःच्या मनगटाच्या बळावर आपले कुटुंब नियोजनबद्ध पद्धतीने चालवित आहेत याचाही मला नेहमी सार्थ अभिमान वाटतो अशा प्रत्येक स्त्रीयांना माझ्याकडून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा !
लेखिका - सुरेखा अनंतराव पाटील, सामाजिक कार्यकर्त्या, लातूर
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.