वंचित बहुजन आघाडीचे केंद्राच्या शेतकरी कायद्या विरोधात आंदोलन .

 वंचित बहुजन आघाडीचे केंद्राच्या शेतकरी कायद्या विरोधात आंदोलन .





भूम-

    केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेले तीन कायदे रद्द करण्यात यावे यासाठी वंचित बहुजन आघाडी भूम तालुका यांच्यावतीने उपविभागीय कार्यालयासमोर  एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागणीचे निवेदन वरिष्ठांना पाठवले

      शुक्रवार दिनांक 5 मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने महाराष्ट्रात दि.०५/०३/२०२१ सकाळी 11 ते सायं. 5 या दरम्यान केंद्र शासनाने घेतलेल्या शेतकरी विरोधी कायदे तात्काळ मागे घेण्यात यावे या मागणीसाठी

 एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचे आव्हान केले केले होते त्या अनुषंगाने ओम तालुक्यातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी ओम अकोला येथे राज्याच्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेले तीन कायदे रद्द करण्यात यावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला 

     एक दिवशीय  एकदिवशिय धरनेआंदोलन प्रविण दादा रणबागुल मराठवाडा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आंदोलनात मुकुंद लगाडे वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबाद जिल्हा प्रशिध्दिप्रमुख,संतोष ईटकर . जिल्हा सदस्य,दत्तात्रय शिंदे .जिल्हा सदस्य, मुसा शेख .भूम तालुका अध्यक्ष, महाविर बनसोडे तालुका उपाध्यक्ष,अमोल इनामदार .तालुका उपाध्यक्ष, वैभव गायकवाड .जिल्हा युवा नेते दिपक ईजगज, शिध्दोधन सरवदे, यश शिंदे, अंकुश थोरात,अनिल भालेराव, पंचशील गायकवाड, शिवाजी पायाळ यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या