प्रत्येक गाव टंचाईमुक्त करण्यासाठी स्लोगच्या माध्यमातून जाणीव जागृती
भूम
भूम तालुका पूर्णपणे पाणीटंचाई मुक्त व्हावा या उद्देशाने नेहरू युवा केंद्र भूम तालुक्याच्या वतीने गावा गावात पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवण्याचा प्रयत्न केला जात आहे .यासाठी अनेकांच्या घराच्या भिंतीवर स्लोगनच्या माध्यमातून माहितीचा प्रसार आणि प्रचार केला जात आहे .
गेले आठ ते दहा दिवसापासून भूम तालुक्यात हाडोंगरी .वंजारवाडी . चिंचोली . बराणपुर आणि उळूप या गावांमध्ये नेहरू युवा केंद्राच्या पुढाकाराने गावकऱ्यांच्या मदतीने आणि गावातील सरपंच .उपसरपंच .प्रशासकीय कर्मचारी . अंगणवाडी कार्यकर्ती . सेविका यांच्या मदतीने भूम तालुका पूर्णपणे पाणीटंचाई मुक्त व्हावा यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रशासनाच्या सूचनांची जाणीव जागृती केली जात आहे .
प्रशासनाच्या सूचनेनुसार हाडोंगरी आणि वंजारवाडी या गावांमध्ये सरपंच . उपसरपंच . सदस्य . बचत गट सदस्य .अंगणवाडी कार्यकर्ती आणि बचत गट महिलांच्या बैठका घेऊन पाणी आडवा पाणी जिरवा संदर्भाच्या माहिती पत्रकाच प्रसिद्धीकरण करण्यात आले .
याशिवाय बरानपुर . उळूप आणि चिंचोली या गावांमध्ये प्रत्येकाच्या घराच्या भिंतीवर पाणी है तो जीवन है . पाणी आडवा पाणी जिरवा . जल है तो कल है . पावसाचा प्रत्येक थेंब आडवा पाणी जिरवा . पाण्याचा अनावश्यक वापर टाळा .पाण्याशिवाय जीवन नाही अशा अनेक प्रकारच्या स्लोगन भिंतीवरती काढून गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं . यासाठी नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक प्रदीप साठ . सहकारी नितीन साठे आणि त्या गावचे ग्रामसेवक आर. जी. हराळ .सरपंच - आर. एम वरळे .चिंचोली ग्रामसेवक डी.आर.गरड .सरपंच - श्रीमती. व्ही. बी.शिर्के .बर्हाणपूर ग्रामसेवक -यु.आर.गुळवे .सरपंच- एस. एस. मिसाळ यांनी विशेष मदत केली .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.