औशयात गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी

 औशयात गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी






औसा प्रतिनिधी- संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती औसा येथील बसवेश्वर गल्ली येथे उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व उपस्थितांना मास्क व सॅनिटायझर ची व्यवस्था करण्यात आली. प्रारंभी मांजरा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल्य उटगे, नगराध्यक्ष अफसर शेख, जिल्हा परिषद सदस्य संतोष वाघमारे, ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा सुधीर पोतदार, वीरशैव कक्कया समाजाचे अध्यक्ष राजप्पा कटके आदी मान्यवरांच्या हस्ते संत गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राजेंद्र बनसोडे यांनी केले .यावेळी सौ मालनबाई राऊत यांनी कंपोस्ट खताच्या माध्यमातून शेती व्यवसायाला दिशा दिल्याबद्दल जयंती समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या समाजाच्या संस्कृतिक सभाग्रहा ची दुरुस्ती व विस्तार करण्याचे अभिवचन नगराध्यक्ष अफसर शेख यांनी यावेळी बोलताना दिले. याप्रसंगी सौ मालनबाई राऊत डॉ.संतोष वाघमारे, श्रीशैल्य उटगे यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी नगरसेवक समीर डेंग मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक गीतेश शिंदे, माजी उप नगराध्यक्ष शशिकला शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देविदास वाघमारे ,अविनाश टिके, कृष्णा सावळकर, ज्योतीराम सूर्यवंशी, गुंडू सूर्यवंशी, दगडू वाघमारे कमलाकर कांबळे, रोहिदास सूर्यवंशी यांच्यासह जयंती समितीचे कार्यकर्ते प्रयत्नशील होते. कार्यक्रमास समाज बांधव व महिला आरोग्य सेतू ॲप नियमाचे पालन करून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भंडारे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या