आरोग्य मंत्री राजेश टोपे ची उपस्थितित जलना येथे कोरोना पार्श्वभूमीवर प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक
जालना प्रतिनिधी
आज जालना येथे कोरोना पार्श्वभूमीवर प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक पार पडली.जिल्ह्यात ट्रॅकींग व टेस्टींगवर अधिक प्रमाणात भर देणे,आरटीपीसीआर तपासण्यांची संख्या वाढणे,रुग्ण बाधितांच्या सहवासितांचा अचुक शोध घेणे,मास्क, सॅनिटायजर व सामाजिक अंतराचे पालन करणे या त्रीसुत्रीच्या पालनाबाबत जनमानसांमध्ये जनजागृती करणे,जिल्हा रुग्णालयात अधिकच्या ऑक्सिजन बेडची तातडीने निर्मिती करणेबाबतचे निर्देश प्रशासनाला दिले.
यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे,निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, डॉ. संजय जगताप, डॉ. प्रताप घोडके, डॉ. कडले,मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, अन्न व औषध प्रशासनविभागाच्या श्रीमती अंजली मिटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.