भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद व्यंकट शिंदे यांची पुन्हा राष्ट्रीय कार्यकारिणी विशेष आमंत्रित सदस्य पदी निवड
औसा प्रतिनिधी
दि 21 मार्च 2021 रोजी
अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालसिह आर्य यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सहमतीने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा च्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व विशेष आमंत्रित सदस्य, स्थायी आमंत्रित सदस्यांची घोषणा करण्यात आली, यात सम्पूर्ण देशातील 31 सदस्यांचा समावेश आहे, त्यामध्ये ,आनंद व्यंकटराव शिंदे यांचा समावेश आहे,
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासन पुरस्कार सन्मानित व भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा रेल्वे बोर्डाचे झेड, आर, यु, सी, सी सदस्य आनंद व्यंकटराव शिंदे यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुन्हा एकदा त्यांना अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारणी मध्ये विशेष आमंत्रित सदस्य पद देण्यात आले ,आनंद व्यंकटराव शिंदे हे लातूर येथील श्री केशवराज विद्यालय लातूर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे, पक्षाने दिलेली वेळोवेळी जबाबदारी स्वीकारून पक्षवाढीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर कार्य करत आहेत , नुकतीच दिल्ली येथे महाराष्ट्र सदन मध्ये 15 मार्च 2021 रोजी त्यांना भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय गौरव सन्मान पुरस्कार भिकू रामजी दाते ( दादा ) भारत सरकार विमुक्त घुमंतू तथा अर्ध घुमन्त जनजाती विकास व कल्याण बोर्डाचे अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आले, तरी त्यांनी या निवडीबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालसिंह आर्य, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, यांच्यासह सर्व वरिष्ठांचे आभार मानले आहे, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पुन्हा एकदा पक्ष
वाढीची
जिम्मेदारी देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले, व त्यांच्या या निवडीबद्दल सर्व समाज बांधवांकडून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे, व त्यांना सर्व समाज बांधवा कडून शुभेच्छा देण्यात येत आहे,
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.