कोवीड१९ चा पून्हा वाढलेला प्रादूर्भाव लक्षात घेता
माझा वाढदिवस सार्वजनीक स्वरूपात साजरा करु नये
रक्तदान व आरोग्यविषयक कार्यक्रमात
मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करावे
पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख
दि.१८ मार्च:
कोवीड-१९ चा पून्हा नव्याने वाढलेला प्रादूर्भाव लक्षात घेता येत्या २१ मार्च रोजी येणारा माझा वाढदिवस मी साजरा करणार नाही, असे नमूद करून हितचींतक तथा पक्ष कार्यकर्त्यांनीही आरोग्याशी संबंधित उपक्रमा व्यतिरीक्त तो सार्वजनीक स्वरूपात साजरा करू नये, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी या संदर्भाने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नियंत्रणात आलेला कोवीड-१९ चा पादूर्भाव या मार्च महिन्यात पून्हा वाढला आहे. दिवसेदिवस रूग्ण संख्येत वाढ होत आहे. हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनस्तरावरून विविध उपाययोजना आखण्यात येत असून जनतेसाठीही नव्याने मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. या परिस्थितीत माझ्या वाढदिवसानिमीत्त एकत्र येऊन कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम उचीत ठरणार नाही. त्यामुळे हितचिंतक, समर्थक, कार्यकर्ते यांनी माझ्या वाढदिवसानिमीत्त कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नयेत, असे आवाहन पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी केले आहे. तथापी रक्तपेढयातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन काही ठिकाणी या दिवशी रक्तदान शिबीर तसेच कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनीटायझर वाटप व आरोग्य जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले असल्याचे समजते आहे. या ठिकाणीही सर्व मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन केले जावे असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले आहे.
---
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.