कोरोनाच्या धास्तीने बाजार पेठेवर विपरीत परिणाम
ग्राहक मंदावल्याने आर्थिक फटका
औसा प्रतिनिधी
कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव मागील एक वर्षापासून सुरू असून सात महिन्याच्या कडक लॉक डाऊन नंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत होते. परंतु फेब्रुवारी 2021 पासून पुन्हा कोरोना विषाणूची दुसरी लाट सक्रिय झाल्यांने पुनश्च कोरोनाच्या धास्तीने उद्योगधंदे आणि बाजारपेठेवर विपरीत परिणाम झाला असून ग्राहक मंदावले असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रात्री 8 वाजल्यानंतर संचारबंदी लागू झाल्या असून रात्री 8 नंतर सर्व व्यवहार बंद होत असून व्यापारी व छोट्या उद्योजकांना आर्थिक फटका बसत आहे. विवाह सोहळे, धार्मिक कार्यक्रम व उत्सव साजरे करण्यावर अनेक निर्बंध लादले असून सध्या 50 नातेवाईकांसोबत विवाह सोहळ्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे कापड व्यापारी, फोटोग्राफर व शूटिंग, लग्नपत्रिका छपाई ,स्वयंपाक करणारे आचारी, किराणा व्यापारी यांच्या व्यवहारावर आर्थिक फटका बसत आहे. अनेक व्यापाऱ्यांची दुकानेही भाडेतत्त्वावर घेतली असून भरमसाठ वार्षिक भाडे ,नोकरांचा पगार, वाढती महागाई ,वीज बिलाचा दणका यामुळे उद्योजक व व्यावसायिक अडचणीत आले आहेत. हॉटेल रात्री 8 नंतर बंद झाल्याने मोठी गुंतवणूक करूनही कोरोना संकटामुळे व्यापारी आर्थिक संकटात भरडले जात आहेत. रात्री 8 वाजता सर्व व्यवसाय बंद करावे लागत असल्याने ग्रामीण भागातील ग्राहक सायंकाळी 6 पासूनच गाव गाठत असल्याने प्रत्येक व्यवसायात ग्राहक मंदावली आहेत. व्यापारी वर्गाला कोरोनाची चाचणी करून अहवाल दर्शनी भागात लावायचा असल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत .ग्राहक मंदावल्याने आर्थिक उलाढाल थंडावली असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे व्यवसायिकांना आर्थिक फटका बसत असून व्यवसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.