शेतातील शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडणी मोहीम तात्काळ थांबवावी: मनसेची मागणी
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील शेतक-यांच्या शेतातील शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडणी मोहीम तात्काळ बंद करा अन्यथा रत्नागिरी-नागपूर हायवे रोखून चक्का जाम अंदोलन करण्याचा मनसेचा अभियंत्याला घेराव घालत इशारा दिला.
सततचा दुष्काळ,नापिकी,कधी अतिवृष्टीने तर कधी अवकाळी पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान होऊन अर्थिक डबघाईला आलेल्या औसा तालुक्यातील शेतीपंपाचे वीज बिल कनेक्शन तोडणी मोहीम तात्काळ थांबवावी.
शेतकर्याच्या शेतातील शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडणी मोहीम वि.वि.कंपनीने कुठलीही कल्पना न देता मणमाणीपने सुरू केली आहे. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असून शेतीपिकाच्या पाण्यासह जणावराच्या पिण्याच्या पाण्यासाठीचा गंभीर प्रश्न असताना विधुत कंपनीचे कर्मचारी व अधिकारी वीज बिलाचा भरणा करून घेण्यासाठी शेतकर्याना तगादा लावत आहेत.तसेच काही शेतकरी आपल्या कुवतीप्रमाणे काही प्रमाणात रक्कम भरण्यास स्वेच्छेने पुढे येत असताना विधुत कंपनीचे कर्मचारी व अधिकारी ते भरुन घेण्यास तयार होत नसुन विशिष्ट एवढ्याच रकमेचा भरणा करण्यासाठी तगादा लावला जात आहे, हा प्रकार त्वरित थांबवुन तोडलेले कनेक्शन तात्काळ जोडणी करावेत तसेच यापुढे कुठल्याही शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडले जाऊ नयेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका औसाच्या वतीने रत्नागिरी-नागपूर हायवे औसा येथे रोखून चक्का जाम अंदोलन करण्याचा इशारा औसा येथील म.र.वि.वि.कंपनीचे उप-कार्यकारी अभियंता श्री जाधव यांना औसा मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यानी घेराव घालत निवेदन देऊन आज इशारा देण्यात आला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.