तृतीय पंथीयांना
चार तासात शिधापत्रिका
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व ग्राहक पंचायतीचा उपक्रम
लातूर/प्रतिनिधी:
भारतीयत्वाचा पुरावाच नसलेल्या अनेक तृतीय पंथीयांना जिल्हा विधीसेवा प्राधिकरण व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने शिधापत्रिका प्रदान करण्यात आल्या.यानंतर आता त्यांना आधारकार्ड,पॅन कार्ड,मतदान ओळखपत्र व जनधन बॅंक खाते काढून दिले जाणार आहे.
तृतीय पंथीयांची आजची अवस्था पाहता जिल्हा व सत्र न्यायधीश आर.एस.
तिवारी यांच्या मार्गदर्शनात विधी-सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश श्रीमती सुनिता कंकणवाडी व अन्न आयोगाचे सदस्य तथा अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अँड.महेश ढवळे यांनी त्वरित दखल घेतली. पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावुन तात्काळ शिधापञिका देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावयास सांगितले.त्यानुसार पुरवठा अधिकारी के.डी देशमुख यांनी अवघ्या चार तासात शिधापत्रिका तयार केल्या. तृतीयपंथी समाजाच्या समस्यांचे निराकरण केले.
अनेक तृतीयपंथी व्यक्तींजवळ भारतीयत्वाचा पुरावाही नव्हता.त्यांच्यासाठी सुरवातीला शिधापञिका नंतर मतदानकार्ड, आधारकार्ड,पँन-कार्ड व जनधन बँक खाते काढुन देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली.
यावेळी बोलताना न्या.कंकणवाडी म्हणाल्या की,तृतीयपंथी हे देखील देशाचे नागरिक आहेत.सामान्य नागरिकांप्रमाणे
त्यांनाही सर्व सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे.महेश ढवळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
या वेळी १५ तृतीय
पंथीयांना शिधापञिका व मतदार नोंदणी अर्जाचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी जिल्हा महिला-बालकल्याण अधिकारी श्रीमती वर्षा पवार, पुरवठा तहसीलदार देशमुख, नायाब तहसीलदार महामुनी ,
बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डोंगरगे,प्रा.दिनेश मोने,पुरवठा निरीक्षक गणेश अंबर,लिपिक काळे,ग्राहक पंचायतचे शहराध्यक्ष इस्माईल शेख,विधी स्वयंसेविका अँड.सुनैना बायस,तृतीय पंथीयांच्या गुरुमाऊली प्रीती माऊली लातुरकर व त्यांचे सर्व तृतीयपंथी सहकारी उपस्थित होते..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.