नवीन जलकुंभांची नगराध्यक्ष अफ़सर शेख यांनी केली पाहणी

 नवीन जलकुंभांची नगराध्यक्ष अफ़सर शेख यांनी केली पाहणी





औसा (प्रतिनिधी) औसा शहराला माकणी धरणातून उच्च दाबाने कायमस्वरुपी पाणी पुरवठा करण्यासाठी योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून सुमारे ३७ किलोमीटर अंतराची पाईपलाईन, धरणात मोठी विहीर, जलशुद्धीकरण केंद्र आणि औसा शहरात तहसील कार्यालयाच्या जवळ, किल्ला मैदानावर आणि साईट अँड सर्विसेसच्या जागेत नवीन जलकुंभ उभारणीचे काम सुरू आहे. औशाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख यांनी रविवारी दिनांक २१ मार्च २०२१ रोजी तहसील कार्यालयाच्या जवळील नव्याने उभारण्यात येणाऱ्या जलकुंभाच्या कामाची पाहणी केली. तहसील कार्यालयाच्या शेजारी नवीन पाण्याच्या टाकीचे काम अंतिम टप्प्यात आले असून शहरवासीयांना या दोन टाकीच्या माध्यमातून बहुतांश भागात उच्च दाबाने सुरळीत पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे. नगराध्यक्ष यांनी बांधकाम करणाऱ्या एजन्सीला काम दर्जेदार व वेळेत करण्याबाबत सूचना दिल्या. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या जवळील नवीन जलकुंभ उभारणी कामास वेग आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या