‘उध्दवा’अजब तुझे सरकार.....


‘उध्दवा’अजब तुझे सरकार.....





शेख मुस्तफा 

एकीकडे जगामध्ये कोराणा ने धुमाकुळ घातला आहे आज ही जग व आपला देश या त्रासदी मधुन बाहेर पडला नाही तोच मार्च महिन्याचे निमीत्त करुन महानगर पालिका,नगर पालिका, महावितरण, बँका ह्या सामान्य नागरीकांवर वसुलीसाठी तुटूण पडल्या आहेत. मार्च महिना आहे हे भरावेच लागेल असा त्यांचा ठेका आहे. 

गेल्या वेळेला मार्च महिना उजाडल्या उजाडल्या केंद्र सरकार ने सामन्य जनतेवर देशात फक्त 500 रुग्ण असताना लॉकडाऊन जाहीर केले. केंद्र सरकारचे आपलेच नियम आहेत कारण कधीच केंद्र सरकारने प्रॅक्ट्रीस न करता डायरेक्ट मैदान उडी मारलेली आहे त्यामध्ये नोटबंदी असो वा जिएसटी त्याप्रमाणे गेल्या मार्च मध्ये जे लॉकडाऊन जाहीर केले ते ऑगस्ट नंतरच टप्प्याने उठविण्यात आले.

या अघोषीत लॉकडाऊनमुळे देशाची,सामन्यांची व लोकांची अर्थव्यवस्था पार डबघाईला आली. पण या वेळी निसर्गाने साथ दिल्यामुळे थोडा का होईना दिलासा मिळाला व पुन्हा सर्व व्यवहार रुळावर येत असताना जानेवरी 2021 मध्ये पुन्हा कोरोना ने धडक मारली पण या वेळेस केंद्र सरकारने पुर्ण जवाबदारी राज्यसरकारांवर ढकलली व राज्य सरकार ने स्थानीक पातळीवर म्हणजे कलेक्टरच्या दरबारी ढकलली व ते मोकळे झाले . 

आज महाराष्ट्रात एकीकडे लाईट बिल साठी तर नगर पालिका,महानगर पालिका टॅक्स साठी जनतेला परेशान करुन सोडले आहे. एकीकडे उर्जामंत्री म्हणता की मी कोणाचे लाईटबिल साठी कनेक्शन तोडणार नाही पण ग्रांऊंड रियालिटी वेगळी आहे. आजच्या घडीला लहान मोठे उद्योग धंदे अंशता किंवा पुर्णतः बंद होण्याच्या मार्गावर आलेले आहेत कारण निर्मीत वस्तूला बाजारात मागणीच नाही त्यामुळे व्यापारी हवालदिल झाला आहे, जिल्हे जिल्हाधिकारीच्या हातात गेल्यामुळे ते आपल्या परिने प्रयत्न करत असतांना लहान लहान हॉटेल, पानटपर्‍या आदी पुर्णंता बंद केले आहे तर, हॉटेल मध्ये बसून जेवण न करण्यामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे असे असताना मात्र महावितरण व नगर पालिका, बँका ह्या वसूलीसाठी तगादा लावलेला आहे यामुळे येणार्‍या काळात जर आत्महत्याचे प्रमाण वाढले तर नवल नको कारण आज वीज ही जिवनावश्यक वस्तु झालेली आहे आज माणूस विजेशिवाय राहू शकत नाही तसेच पाणी हे तर जीवनच आहे आणि आज याच कमजोरीचा फायदा घेत शासन वर तर म्हणत आहे की आम्ही वसुली करणार नाही पण एकीकडे पाणीपट्टी व लाईटबिल साठी जनतेला परेशान करत आहेत. यामुळे या शासनावर जनतेचा विश्‍वास उडत चालला आहे त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री या गोष्टीकडे लक्ष घालून महावितरणच्या   वसुलीला व पाणीपट्टी वसुलीला थोडा का होईना धीर देतील का अशी अशा आता जनतेतून व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या