विवेकानंद रुग्णालयात कोरोना लसीकरणास प्रारंभ
लातूर/प्रतिनिधी:शहरातील नामांकित अशा विवेकानंद रुग्णालयात बुधवारपासून (दि.३ मार्च )कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला.
कोरोनाकाळात रुग्णालयाने केलेले काम पाहून पहिल्याच टप्प्यात रुग्णालयाची लसीकरणासाठी निवड करण्यात आली आहे.नृसिंह फलटणकर यांना लस देवून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.यावेळी रुग्णालयाचे प्रशासनिक संचालक
अनिल अंधोरीकर,कार्यवाह डॉ.राधेशाम कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून विवेकानंद रुग्णालयाने झोकून देत उपचार सुरू केले.कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.त्यामुळे आजही अनेक रुग्ण विवेकानंद रुग्णालयात उपचार घेत आहेत.
सामाजिक भावनेतून येथे उपचार केले जातात.
शासनाच्या विविध सवलतींचा लाभ रुग्णांना दिला जातो.
शासनाने खाजगी आणि सेवाभावी रुग्णालयांत लसीकरणास परवानगी दिली आहे.यात पहिल्या टप्प्यात विवेकानंद रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे.त्यानुसार ही लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.शासकीय निकषांचे पालन करून लसीकरण केले जात असून लस घेवू इच्छिणाऱ्या नागरिकांनी विवेकानंद रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.