सोयाबीनला मार्केटपेक्षा जास्त भाव देण्याच्या बहाण्याने शेतक-यांची फसवणुक, लातूर पोलीसांकडून गुन्हा दाखल.
दिनांक ०९/०३/२०२१ रोजी श्री. तानाजी निवृत्ती देवकर वय- ५० वर्षे व्यवसाय- शेती रा. देवळाली ता. कळंब जि. उस्मानाबाद यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे, लातूर येथे इसम नामे वैजनाथ लक्ष्मण डोंगरे यांच्याविरोधात शेतक-यांना फसविल्याबाबत गुन्हा दाखल केलेला आहे. नमुदच्या गुन्हयाची थोडक्यात हकीकत अशी की, लातूर येथील व्यापारी श्री.
वैजनाथ लक्ष्मण डोंगरे हे त्यांच्या लातूर स्थित डोंगरे ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळया शेतक-यांना मार्केटपेक्षा वाढीव भावाने सोयाबीन, तूर, उडीद, मुग यांची प्रत्यक्ष गावातून खरेदी करीत होते व ठरलेल्या दराप्रमाणे शेतक-यांना पैसे देत होते, त्यामुळे त्यांनी ब-याच शेतक-यांचा विश्वास संपादन केलेला होता. याच कारणास्तव यातील तकारदार श्री. तानाजी निवृत्ती देवकर यांनी देखील सन २०१८-२०१९ मध्ये त्यांच्या शेतातील रक्कम रूपये ५,४०,०००/- रूपयाचे १३३ किवंटल सोयाबीन डोंगरे यांना दिले होते. त्यावर डोंगरे यांनी तक्रारदार श्री. तानाजी देवकर यांच्या तसेच त्यांच्या मुलाच्या नावाने चेक (धनादेश) दिले होते. परंतू सदरचे चेक बँकेमध्ये वटले (क्लिअर) झाले नाहीत. त्यावर तक्रारदार यांनी वेळोवेळी श्री.वैजनाथ डोंगरे यांच्याकडे त्यांनी विकलेल्या सोयाबीनच्या पैशाची मागणी केली, परंतू डोंगरे यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यावर श्री. देवकर यांनी अधिक माहिती घेतली असता त्यांच्या निदर्शनास आले की, त्यांच्यासारखेच अंदाजे ४३ शेतक-यांचे सुध्या पैसे डोंगरे यांनी दिलेले नाहीत. सर्व शेतक-यांच्या खरेदी केलेली शेतमालाची रक्कम ही २,१७,९०,७५५/- रू. इतकी असून त्या सर्व शेतक-यांची फसवणूक झाली असल्याबाबत श्री. तानाजी देवकर यांनी सर्वांच्या वतीने शिवाजीनगर पोलीस ठाणे, लातूर येथे तक्रार दिल्याने दिनांक ०९/०३/२०२१ रोजी गुन्हा. रजि. क्र . १२१/२०२१ भा.दं.वि. कलम ४०६, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री . सुनिल पुजारी हे करीत आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.