सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ठिकाणी कोवीड १९ डेडीकेटेड हॉस्पिटल सुरू करण्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश


 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ठिकाणी कोवीड १९ डेडीकेटेड हॉस्पिटल सुरू करण्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश.

लातूर (प्रतिनिधी)-

लातूर शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ,लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सुसज्ज इमारतीमध्ये  पुन्हा 'कोवीड १९ डेडीकेटेड रुग्णालय' सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.

   या वर्षात मार्च महिन्यात महाराष्ट्रात पुन्हा रुग्ण संख्येत वाढ होत आहे. लातूर जिल्ह्यातही रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांवर वेळेत आणि योग्य पद्धतीने उपचार व्हावेत म्हणून लातूर शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या परिसरात बांधून तयार असलेल्या सुसज्ज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इमारती मध्ये 'कोवीड१९ डेडीकेटेड रुग्णालय' सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले आहेत.मागच्या वर्षात कोरोना१९ डेडीकेटेड रुग्णालय सुरू करण्यात आले होते. या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट सह अनेक अद्ययावत सुविधा उभारण्यात आल्या आहेत त्यामुळे वेळेत उपचार झाल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचले होते.

आता मागच्या काही दिवसात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे हे लक्षात घेऊन पुन्हा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल च्या ठिकाणी कोवीड १९ डेडीकेटेड रुग्णालय सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले आहेत.

पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या निर्देशा नुसार कोवीड १९ डेडीकेटेड रुग्णालय तातडीने सुरू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारीबीपी.पृथ्वीराज यांनी सांगितले आहे.


-------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या