किराना दुकांनात गुटखा विक्री जोमात अन्न भेसळ कोमात ?
पान टपरी बंद मटेरियल विक्री चालू
औसा प्रतिनिधी औसा लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांना दिनांक २७ मार्च २०२१ रोजी पासून जिल्ह्यातील हॉटेल, बार,रेस्टोरेंट, सांस्कृतिक सभागृह, पान टपऱ्या बंदचे आदेश दिले आहेत तरी ही औसा शहरातील बहुतांश किराणा दुकाना मधे गुटखा,सुगन्धिध तंबाकू, दुपट्ट भावात विक्री सुरु आहे.अन्न व औषेधी प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे.अता शहरातील नागरिकांनी गुटका व सुगन्धित तंबाखू बंद करण्याची मागणी केली आहे.अन्न व औषेधि जिल्हा कार्यालय औसा शहरापासून २० किलों मीटरच्या अंतरावर आहे तरी ही कोणती कार्यवाही होत नसल्याने किराना दुकांनात गुटखा विक्री जोमात अन्न भेसळ कोमात अशी गत झाली आहे !
जिल्हाधिकारीच्या आदेशाला औसा शहरात पायमल्ली होताना दिसत आहे !
पान टपरी वर गर्दी होऊ नए म्हणून जिल्हाधिकारीनी जिल्ह्यातील पान टपऱ्या बंदचे आदेश दिले होते पान टपरी चालकाने आपली दुकानें बंद करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिले मात्र किराणा दुकानात सुगंधित तंबाखू, गुटखा विक्री जोमात सुरू आहे जिल्हाधिकारी याकडे लक्ष देतील ? यांच्यावर कारवाई करतील ? याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे !
लातूर रिपोर्टर के लिए अहमदपुर. उदगीर जलकोट देवणी निलंगा रेणापुर किल्लारी उजनी के लिए रिपोर्टर नियुक्त करना है इच्छुक अपना biodata laturreporter2012@gmail. Com पर मेल करें
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.