हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर छापा, 3 लाख 87 हजाराचा मुद्देमाल जप्त, 07 गुन्हे दाखल, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*


*हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर छापा, 3 लाख 87 हजाराचा मुद्देमाल जप्त, 07 गुन्हे दाखल, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*







लातूर प्रतिनिधी 

                   या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, लातूर जिल्ह्यात अवैध रीतीने हातभट्टी दारू ची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी दिलेले होते. याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे ,अपर पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी, चाकूर श्री. विद्यानंद काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे, पोलीस ठाणे रेणापुर चे पोलीस निरीक्षक श्री.नानासाहेब उबाळे यांच्या नेतृत्वाखाली वसंतनगरतांडा तालुका रेणापुर येथे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणारे  07 इसमावर स्थानिक गुन्हे शाखा,लातूर व पोलिस ठाणे रेणापुर यांचे पथकाने आज दिनांक. 25/04/2021 रोजी सकाळी छापामारी केली. यामध्ये 81,000  लिटर रसायन व साहित्य असा एकूण किंमत 3 लाख 87 हजार रुपये चे रसायन आणि हातभट्टी निर्मिती चे साहित्य नाश करण्यात आले आहे 

                या कार्यवाहीत 

1) सुखदेव खंडू राठोड राहणार वसंतनगर तांडा 

2) रमेश भाऊसाहेब चव्हाण राहणार वसंतनगर तांडा 

3) बालाजी भानुदास चव्हाण राहणार वसंतनगर तांडा

4) विनायक भानुदास चव्हाण राहणार वसंतनगर तांडा

5) फुलाबाई गणू चव्हाण राहणार वसंतनगर तांडा 

6) बालाजी सुखदेव राठोड राहणार वसंतनगर तांडा 

7) बाबाराव माणिक पवार राहणार वसंतनगर तांडा, तालुका रेणापुर जिल्हा-लातूर

                 अशा एकूण 07 आरोपीवर पो.ठाणे  रेणापुर येथे एकूण 07 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

              वरील कामगिरीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार संजय भोसले, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड , राजेंद्र टेकाळे ,प्रकाश भोसले ,रामहरी भोसले ,युसुफ शेख ,राहुल सोनकांबळे, प्रमोद तरडे ,रामदास नाडे, नितीन कटारे ,सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव ,हरून लोहार, यशपाल कांबळे ,नागनाथ जांभळे, प्रदीप चोपण तसेच रेनापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार गुळभिले पोलीस नाईक ठाकरे महिला पोलीस अंमलदार पवार यांनी ही कार्यवाही केली आहे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या