नेत्र व दंत चिकित्सालये दि.३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश
लातूर/प्रतिनिधी: कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या आजाराचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये यासाठी महानगरपालिका हद्दीतील नेत्र व दंत चिकित्सालये दि.३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त अमन मित्तल यांनी दिले आहेत.
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे.शहरातील रुग्णालये व महानगरपालिकेच्या कोविड केअर सेंटर मध्येही रुग्ण वाढत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने लॉकडाऊन केलेले आहे.यातून अत्यावश्यक सेवांना सवलत देण्यात आलेली होती.त्यात रुग्णालयांचा समावेश होता.
परंतु वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अशा दुकानांच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीतून आजाराचा प्रसार होण्याचा धोका आहे. नागरिकांनी या काळात शारीरिक अंतराचे पालन करणे व सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे आवश्यक आहे. त्यामुळे आयुक्तांनी नेत्र व दंत चिकित्सालये दि.३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
--

Respected Sir/Madam.
Please find attached here with
Thanking You.
#For
commissioner,
Latur city municipal corporation,Latur
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.