शेतीविषयक बी-बियाणे व यंत्र सामग्रीची दुकाने दि.३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश

 


लातूर/प्रतिनिधी: कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या आजाराचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये यासाठी महानगरपालिका हद्दीतील शेतीविषयक बी-बियाणे व यंत्र सामग्रीची दुकाने दि.३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मा. आयुक्त अमन मित्तल यांनी दिले आहेत.

  कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. शहरातील रुग्णालये व महानगरपालिकेच्या कोविड केअर सेंटर मध्येही रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने लॉकडाऊन केलेले आहे. यातून शेतीविषयक बी-बियाणे व यंत्रसामुग्रीच्या दुकानांना सवलत देण्यात आलेली होती. परंतु वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अशा दुकानांच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीतून आजाराचा प्रसार होण्याचा धोका आहे. नागरिकांनी या काळात शारीरिक अंतराचे पालन करणे व सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतीविषयक बी-बियाणे व यंत्रसामग्रीची व शेती

संबधीत इतर दुकाने दि.३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


--



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या