*बारा नंबर पाटी एमआयडीसीतील कोविड सेंटरवर पाच दिवसापासून औषधांचा तुटवडा !*
*जबाबदार कोण ?*
लातुर : दि. २० - लातूर पासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या १२ नंबर पाटी, नवीन एमआयडीसीतील कोविड सेंटरवर मागील पाच दिवसापासून औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
सेंटरवर दाखल असलेल्या रुग्णाला दररोज द्यावयासाठी लागणाऱ्या विटामिन सी आणि एम व्हि बी सी या गोळ्याच मागील ५ दिवसा पूर्वीच संपून गेलेल्या आहेत. आणि आज ही त्या गोळ्या उपलब्ध नाहीत !
मग प्रशासन नेमके करतय काय ? याला जबाबदार कोण ? लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे. अत्यावश्यक गोळ्याच संपून गेल्या असल्यामुळे तेथील डॉक्टरांनीही हात वरी केले आहेत .
सेंटरवरील एका डॉक्टरने आमच्या वरिष्ठांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळवले आहे. मात्र आम्हाला अजूनही गोळ्या उपलब्ध झालेल्या नाहीत असे सांगितले.
शासकीय यंत्रणेतील हा हलगर्जीपणा सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या जीवावर बेतण्याची भीतीही लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी व्यक्त केली आहे.
कोविड सेंटरवरील व्यवस्थापक डॉ. शिल्पा शिंदे यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला असता त्या माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचेही पनाळे यांनी म्हटले आहे.
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वैद्यकीय मंत्री अमित देशमुख हे सध्या लातूर येथेच असून जिल्हामध्ये त्यांचा पाहणी दौरा सुरू असूनही बारा नंबर पाटी एमआयडीसीतील कोविड सेंटरवरील चालू असलेली अशी दुरावस्था त्यांच्या लक्षात आली नाही काय ? असा सवाल लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी केला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.