सौ.सविता धर्माधिकारी यांचा राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मान
लातूर-भविष्यवेधी शिक्षण आणि नावीन्याचा ध्यास घेतलेल्या सर्व महिलांसाठी मातृसेवा फाउंडेशन, ठाणे; स्माईल टीम, यवतमाळ;
साप्ताहिक/मासिक शिक्षक ध्येय महाराष्ट्र , यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कोरोनाचे भिषण संकट असताना ऑनलाईन पध्दतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. या नवोपक्रम राज्यातील विविध जिल्ह्यांतील महीलांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला.या स्पर्धेत एकूण 107 स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यापैकी 47 उपक्रमांची निवड झाली. शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या अनेक शिक्षिकांनी विविध विषयांवर आपले नवोपक्रम पाठवले होते.या 107 नवोपक्रमाचे परीक्षण डॉ.बाबासाहेब गणपत बडे अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट नाशिक यांनी पारदर्शक पद्धतीने केले.विजयी स्पर्धकांना कर्तृत्ववान महिला पुरस्कार जाहीर करण्यात आला . पुरस्कारासाठी प्रमाणपत्र, ट्रॉफी, शिक्षक ध्येय दिवाळी अंक व विद्यार्थी दिनदर्शिका ऑनलाईन कुरीयरने पाठवण्यात आली . लातूर जिल्ह्याच्या एकमेव शिक्षिका सौ. सविता जयंतराव धर्माधिकारी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कासारखेडा ह्या या कर्तृत्ववान महिला पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.
आदरणीय गटशिक्षणाधिकारी श्री. धनराज गिते यांनी हा पूरस्कार त्यांना पंचायत समिती सभागृहात प्रदान केला.त्या प्रसंगी विस्ताराधिकारी श्री. म्हेत्रेसाहेब ,डायटचे मराठी विभाग प्रमुख श्री. रमेश माने सर,तंत्रस्नेही श्री. सतिश सातपुते सर, केंद्रप्रमुख श्री. तांबोळी सर,श्री. कोळी सर,श्री. मेनगुलेसर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. रामकिसन सुरवसे सर सर्व विषय साधनव्यक्ती,व सर्व अभ्यासू शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होत्या. टाळ्यांच्या गजरात हा सन्मान सोहळा पार पाडला.पुरस्कार प्राप्त सामाजिक शास्त्र विषयाच्या नवोपक्रमाची माहिती मॅडमनी उपस्थितांना दिली.यावेळी गटशिक्षणाधिकारी म्हणाले की,सौ.सविता धर्माधिकारी म्हणजे सतत शैक्षणिक, साहित्य व संशोधन क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात.त्यांचे खुप खुप अभिनंदन.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.