पेट्रोल-डिझेल दरवाढीने शेती मशागत महागली
उत्पादन खर्चावरील वाढीमुळे शेतकरी हैराण
निहाल पटेल
औसा : प्रतिनिधी शेतातील नांगरणी, पेरणी, रोटावेटर इत्यादी शेतीची कामे ट्रॅक्टर व इतर इंधन अवजाराने केली जातात. मात्र पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे यावर्षी शेती मशागत महागली असून शेतकऱ्यांना मशागतीच्या कामांसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.
सरकारने सन २०२२ पर्यंत शेतकन्यांचे उत्पन्न दुप्पट करू असा दावा केला आहे. प्रत्यक्षात मात्र रासायनिक खते, फवारणी, औषधी, ट्रॅक्टर व इतर औजारे सारख्या शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज वाढत असल्याने ट्रॅक्टर द्वारे केली जाणारी शेतीच्या मशागतीची कामे महागली आहेत. ट्रॅक्टर खरेदीवर व अवजारे खरेदी यावर
त्यामुळे शासनाने शेती पूरक अवजारे जीएसटी मुक्त करावीत व रासायनिक खते फवारणी च्या औषधींच्या किमती स्थिर ठेवाव्यात अशी मागणी जोर धरत आहे.
महागडी खते, कीटकनाशके, शेतीची अवजारे खरेदी करण्यातच शेतक-्यांचे कर्ज संपून जाते. शिवाय सावकारांच्या दारात जाऊन पुन्हा रक्कम उभी करावी लागत आहे. दरवर्षी रासायनिक खताचे तसेच कीटकनाशकांचे दर वाढत आहे. त्यांचा फटका शेतक-्यांना बसत आहे. तसेच आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढत चालल्याने नांगरणी, वखरणी, चिखलणी तसेच कापणी, मळणी इत्यादीचेही दर वाढले आहे. यामुळे शेतकर्यांचे नियोजन कोलमडले आहे. यामुळे निश्चितच प्रत्येक ठिकाणी उत्पादन खर्चात झालेली वाढ व उत्पादनावर होणार नफा यामध्ये ताळमेळ बसविणे शेतकरयांना अवघड होत आहे.
२२%, फवारणी औषधीवर १८% जीएसटी लावला जात आहे. त्यामुळे शेतीपूरक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत तर रासायनिक खते शेतकरी जास्त वापरतात त्यांच्याही किमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात आपोआपच वाढ झाली आहे. रासायनिक खते व फवारणीच्या औषधींचा वापर न केल्यास संकरित बियाणांची शेती उत्पन्न देऊच शकत नाही.
खते व फवारणी शिवाय शेतातील पीक वाढत नाही व वाढलेच तर विविध रोगांचा प्रार्दुभाव पिकांवर पडतो. म्हणून यावर होणारा खर्च शेतकरी टाळू शकत नाही. शिवाय शेतकरयांना शेती कामासाठी मजूर मिळते कठीण झाले आहे. म्हणून शेतकरी शेतीपूरक औजारांचा वापर करतात मात्र या आवजारांवर पण जीएसटी आकारली जाते. परिणाम परत शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात अजून भर पडते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.