ऑफिसर क्लब,शासकीय वसाहत लातूर येथे कोविड केअर केंद्र होणार


ऑफिसर क्लब,शासकीय वसाहत

लातूर येथे कोविड केअर केंद्र होणार



 

लातूर,दि.26 (जिमाका) जिल्ह्यात कोव्हीड-19 रुग्णांची वाढ होत असून अतिरिक्त व्यवस्था करणे अगत्याचे झाले आहे.त्यासाठी ऑफिसर क्लब, शासकीय वसाहत, बार्शी रोड लातूर या इमारतीमध्ये कोविड सेंटर (Covid Care Center) स्थापन करण्याची बाब जिल्हा प्राधिकरणाच्या विचारधीन होती. जिल्हाधिकारी तथा  जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यावस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन ऑफिसर क्लब, शासकीय वसाहत, बार्शी रोड लातूर या इमारतीमध्ये कोविड सेंटर (Covid Care Center) स्थापन करण्याचे आदेश जारी केले आहेत.

जिल्हा शल्य चिकित्सक / जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. लातूर यांनी सदरील इमारत ताब्यात घेऊन तेथे कोविड केअर सेंटर (Covid Care Center) स्थापन करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.

या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 चे कलम 51,55 तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार तसेच महाराष्ट्र कोव्हिड-19 उपयोजना नियम 2020 च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घ्यावी असे ही आदेशात नमुद केले आहे.

                                                  ****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या