जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट
होण्याचे हवामान खात्याचे संकेत
लातूर,दि.27 (जिमाका) मराठवाडयातील सर्व जिल्हयामध्ये दिनांक 26 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 पर्यंत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवेळ पाऊस व गारपीट होण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहे. या कालावधीत नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवून दर तासानी पडणाऱ्या पावसाबाबत तसेच काही हानी झाल्यास त्याबाबत संदेश या कार्यालयास दयावा. व सदर कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हयातील सर्व शेतकरी, नागरिक यांनी पूढील प्रमाणे खबरदारी घ्यावी.
विजांचा कडकडाट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे. शेतकऱ्यांनी दुपारी 03 ते 07 या वेळेत शेतीची व इतर कामे करु नये कारण सदर कालावधीमध्ये विजा पडण्याची शक्यता जास्त असते.दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वत: सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा. पाऊस सुरु असताना विजेच्या तारा / जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते.तरी त्यापासून दुर राहण्याची खबरदारी घ्यावी. अशा सुचना आपल्या अधिनस्त पोलीस अधिकारी / तलाठी / मंडळ अधिकारी / ग्रामसेवक / सरपंच / कृषी सहाय्यक यांचे व्दारे निर्गमित करुन आपण आपल्या तालुक्यातील गावांना सावधगीरीची सूचना देवून योग्य ती उपाययोजना करावी . सदरच्या कालावधीत कोणीही आपले मुख्यालय सोडू नये असे अपर जिल्हादंडाधिकारी, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.