शिवसेनेच्या वतीने कोरोना जनजागृती अभियान पोलिसांना मास्क व सॅनिटायझर वाटप शेवटच्या घटकाच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न- उपजिल्हाप्रमुख सचिन दाने

 


शिवसेनेच्या वतीने कोरोना जनजागृती अभियान 

पोलिसांना मास्क व सॅनिटायझर वाटप 

शेवटच्या घटकाच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न- उपजिल्हाप्रमुख सचिन दाने









रेणापूर/प्रतिनिधी: सध्याची कोरोना परिस्थिती पाहता शिवसेनेच्या वतीने लातूर ग्रामीण मतदारसंघात कोरोना जनजागृती अभियान सुरू करण्यात आले असून या अभियानाचे उद्घाटन तहसीलदार राहुल पाटील व पोलीस उपनिरीक्षक माचेवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या अंतर्गत रेणापूर येथील पोलिसांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिवसेनेचे पदाधिकारी या माध्यमातून पोहोचणार असल्याचा विश्वास शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
   राज्यात महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेच्या वतीने कोरोना विरोधातील लढाई गतिमान पद्धतीने सुरू आहे.आता लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांच्या पुढाकारातून एक रथ तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.व पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासह जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात या माध्यमातून कोरोना संदर्भात जनजागृती, लसीकरण गतिमान करणे तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये यासाठी काम केले जाणार आहे.
   शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांनीच या अभियानाची संकल्पना मांडली आहे.सोमवारी ( दि.२५ एप्रिल )तहसीलदार राहुल पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक माचेवाड यांच्या हस्ते कोरोना जनजागृती अभियान व लसीकरण रथाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी पोलिसांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
  यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती क्रांती निर्मळ,पोलीस नाईक संतोष ठाकरे,संतोष गायकवाड, अभिजीत थोरात,बालाजी डपडवाड,अनंत बुधोडकर, नरसिंग जाधव आदी पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
  यावेळी बोलताना तहसीलदार राहुल पाटील म्हणाले की,ग्रामीण भागात कोरोना वाढत आहे.त्यामुळे लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
  यावेळी बोलताना अभियानाचे संयोजक सचिन दाने म्हणाले की,प्रशासनाच्या सहकार्यातून ग्रामीण भागात जास्तीत जास्त लसीकरण करून घेण्यासाठी आम्ही काम करणार आहोत.कोरोना विरुद्धच्या लढाईत महाविकास आघाडी सरकार व शिवसेना जनतेसोबत आहे.नागरिकांनी घाबरून जाऊ नये.अडचणीच्या काळात प्रशासन किंवा शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.गावोगावचे शिवसैनिक संकटकाळात मदत करण्यास तयार आहेत.
   पोलिस प्रशासनाच्या सहकार्यातून प्रत्येक गावात लॉकडाऊन नियमाप्रमाणे पाळण्यासाठी आम्ही मदत करणार आहोत.जे कोरोनाबाधित गृह विलगीकरणात आहेत त्यांच्या हातावर प्रशासनाने होमकॉरंटाईनचा शिक्का मारावा.जे नागरिक कोरोनाच्या भीतीने शेतात राहत आहेत त्यांच्यासाठी सिंगल फेज विजेची सोय करावी,असेही ते म्हणाले.
   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, एकनाथ शिंदे,जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे यांच्या आदेशावरून तसेच जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी,लातूर ग्रामीण तालुकाप्रमुख ॲड.प्रवीण मगर,रेणापूर तालुका प्रमुख हरिभाऊ साबदे यांच्यासह सर्व पदाधिकारी शेवटच्या घटकापर्यंत जाऊन मदत करण्यास तत्पर असल्याचे ते म्हणाले.
   यावेळी ग्रामीण तालुकाप्रमुख ॲड. प्रवीण मगर,कोंडीराम काळे,कपिल चितपल्ले,बालाजी कस्पटे, मुन्ना आकनगिरे यांच्यासह शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या