रेमडीसिविर इंजेक्शन्स चा काळा बाजार करणाऱ्यांना अटक **दोन रेमडीसीवीर जप्त,, स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही*


*रेमडीसिविर इंजेक्शन्स चा काळा बाजार करणाऱ्यांना अटक **दोन रेमडीसीवीर जप्त,, स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही*




लातूर प्रतिनिधी 

.... ,,सध्याचे कोविड 19 परिस्थितीमध्ये काही लोक लातूर शहरात रेमडीसिविर इंजेक्शन्स चा काळाबाजार करून जास्त किमतीमध्ये रेमडीसिवीर इंजेक्शन्स विक्री करत असल्याबाबतची माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे यांनी अशा काळाबाजार करणाऱ्या इसमावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते




या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री हिंमत जाधव डी वाय एस पी श्री जितेंद्र जगदाळे लातूर शहर यांच्या  मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली मागील काही दिवसापासून रेडीमशिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या इसमांच्या मागावर पोलीस होते,



स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार  अंगद कोतवाड, संपत फड , सुधीर कोळसुरे , बालाजी जाधव , नाना भोंग, नामदेव पाटील तसेच अन्न व औषधी विभाग चे औषध निरीक्षक श्री सचिन बुगड यांच्या पथकाने शाहू चौकाच्या पुढे आंबेडकर चौकाजवळ 

1 अनिकेत माधव तेलंगे वय 20 राहणार जानवळ हल्ली मुक्काम नाथनगर लातूर आणि 

2 ओमकार भगवान शेळके वय 26 राहणार आष्टा , हल्ली मुक्काम लातूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन रेमडीसीवीर इंजेक्शन्स किमती 10200 रुपये आणि दोन मोबाईल किंमत 20000  रुपये चे असा एकूण 30200 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ,

वरील आरोपी हे सदरचे रेमडीसिविर इंजेक्शन्स प्रत्येकी 25 हजार रुपये दराने  गरजू व्यक्तींना विक्री करणार होते या दोघांसह अन्य एका व्यक्ती अशा  एकूण तिघा इसमावर पोलिसांनी पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे कलम  420,188,34 भारतीय दंड संहिता ,, कलम 3,7 जीवनावश्यक वस्तू कायदा ,, कलम 3 साथरोग नियंत्रण कायदा ,, कलम 26 औषध किंमत नियंत्रण आदेश 2013 कलम 18 सी 27 औषधी  आणि सौंदर्यप्रसाधने अधिनियम 1940 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,


अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही औषधांची काळाबाजारी किंवा चढ्या दराने विक्री करू नये असे आवाहन लातूर जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने करण्यात करण्यात येत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या