औसा शहरातील ग्रामीण रुग्णालय व कोव्हिड सेंटरला एम आय एम पक्षाचे औसा तालुका प्रभारी इंचार्ज अफसर शेख यांची भेट
औसा मुख्तार मणियार
औसा:दि.२९ - एम आय एम पक्षाचे औसा तालुका प्रभारी इंचार्ज अफसर शेख यांनी शहरातील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली व तेथील रुग्णांची विचारपूस केली व सर्व स्टाफ व वैद्यकीय अधीक्षक यांना सुचना केली की या ठिकाणी च्या रुग्णांची काळजी करावी. औसा शहरातील कोविड सेंटर ची चर्चा जिल्ह्यात चांगल्या प्रकारच्या सेवेसाठी प्रसिध्द आहे. तरी येथील वैद्यकीय अधीक्षक अंगद जाधव व त्यांचा स्टाफ अत्यंत काळजीपूर्वक रुग्णांची देखभाल करत आहेत. सर्व स्टाफ ची भेट घेतल्यानंतर अफसर शेख यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली व सोशल डिस्टंसिंग कोविड चे नियम पालन करावे असे सर्वांना सांगितले. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अंगद जाधव व डॉक्टर रणदिवे यांनी त्यांचे स्वागत केले व सर्व रुग्णांची सुश्रुषा कशी केली जाते याविषयी सविस्तर चर्चा केली. शहरातील साडेसात हजार लोकांनी लसीकरण केले आहे. लसीकरणाबाबत शहरात उदासीनता असल्याचे दिसून आले. येणाऱ्या काळामध्ये लसीकरण वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. हेल्थ विभाग आणि पोलिस प्रशासन तसेच पत्रकार यांचे आभार व्यक्त करून असेच नेहमी सहकार्य करत रहावे असे आवाहन त्यांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.