औसा शहरातील ग्रामीण रुग्णालय व कोव्हीड केअर सेंटर ला आ. अभिमन्यू पवार यांची भेट
औसा (प्रतिनिधी)तहसील कार्यालय, औसा येथे कोरोना संदर्भात आढावा बैठक घेऊन शहरातील ग्रामीण रुग्णालय व कोव्हीड केअर सेंटर ला आज आमदार अभिमन्यू पवार यांनी भेट दिली!
आज तहसील कार्यालय, औसा येथे बैठक घेऊन कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती, प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरणाचा आढावा घेतला. एकूण ॲक्टीव रुग्णांपैकी जवळपास ८०% रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे शहरातील कोव्हीड केअर सेंटरसह प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सुद्धा ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवण्याची गरज आहे. आमदार निधीतून औसा कोव्हीड केअर सेंटर येथे १०० ऑक्सिजन बेड्स तर मतदारसंघातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर गरजेनुसार ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करण्यासाठी तातडीने प्रस्तावित करण्याच्या सूचना दिल्या. टेस्टिंग आणि लसीकरणाची संख्या नियोजनबद्धपणे वाढविण्याच्या सूचनाही आमदार पवार यांनी दिल्या.
ग्रामीण रुग्णालय, औसा व याकतपूर रोडवरील कोव्हीड केअर सेंटरला भेट देऊन तेथील वैद्यकीय कर्मचारी, कोरोना रुग्ण, त्यांचे कुटुंबीय यांची चौकशी केली व जेवणासह इतर सुविधांचा आढावा घेतला.
यावेळी उपविभागीय अधिकारी श्री अविनाश कांबळे, तहसीलदार सौ शोभाताई पुजारी, गटविकास अधिकारी श्री सूर्यकांत भुजबळ, औसा नगरपरिषद मुख्याधिकारी श्री तानाजी चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉ जाधव व अधिकारी उपस्थित होते!
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.