भाजपचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान प्रदेश सचिव मा.नागनाथ निडवदे
(आण्णा) यांचं आज दुपारी औरंगाबाद येथे निधन झाले
शेवटच्या श्वासापर्यंत पक्ष संघटनेसाठी कार्यरत राहणारा सच्चा स्वयंसेवक हरवला-आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
लातूर/प्रतिनिधी: नागनाथअण्णा निडवदे यांनी स्वतःचे जीवन पक्षकार्यासाठी समर्पित केले होते.शेवटच्या क्षणापर्यंत ते पक्षकार्य करत राहिले.अण्णांच्या जाण्याने एक सच्चा स्वयंसेवक हरवल्याची भावना आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली.
आ.निलंगेकर म्हणाले की, नागनाथअण्णा निडवदे हे पक्षाचे पाईक होते.पक्षाचा विचार घराघरात रुजवण्याचे मोलाचे काम त्यांनी केले.पक्ष विस्तारातही त्यांनी मोठी भूमिका निभावली.बुथरचना मजबूत करण्यासाठी ते झटत राहिले.
आ.निलंगेकर यांनी सांगितले की,नागनाथअण्णा निडवदे सलग दोनवेळा पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत झाले.सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर पक्षाचा झेंडा फडकवण्याचे काम अण्णांच्या संघटन कौशल्यामुळेच शक्य झाले. नागनाथअण्णा निडवदे यांच्या जाण्यामुळे भारतीय जनता पक्षाची मोठी हानी झाली आहे.कौटुंबिक पातळीवर माझे अतोनात नुकसान झाले आहे. अण्णांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे.एक सच्चा संघ स्वयंसेवक,पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता, ध्येयवादाने प्रेरित होवून अखंड कार्यरत राहणारा नंदादीप आज शांत झालेला असल्याचेही आ.निलंगेकर यांनी म्हटले आहे.
--
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.