*शिवाजी नगर पोलिस स्टेशन च्या पोलिसांनी हरवलेल्या लहान मुलाचा अवघ्या एका तासात लावला शोध*
लातूर प्रेस नोट
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,आज दिनांक 02/04/2021 रोजी सकाळी 0900 वाजण्याच्या सुमारास खाडगाव रोड,सुशीलादेवी कॉलेज जवळ राहणाऱ्या एक वृद्ध महिला पोलीस ठाणे शिवाजी नगर येथे त्यांचा नातू नामे रुद्र शिवकुमार छत्रबंद वय-08 वर्ष हा हरवलेची तक्रार देण्यासाठी आले होते.
ऑन ड्युटी असलेले पोलीस ठाणे अंमलदार श्री.गारोळे यांनी सदर वृद्ध महिला यांचेकडून हरवलेल्या मुलाची पूर्ण माहिती नाव,पत्ता ,त्याचे वर्णन घेतले व लागलीच पेट्रोलिंगला असलेल्या चार्ली व जीप पेट्रोलिंगला असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वायरलेस व फोनद्वारे हरवलेल्या मुलाचे वर्णन सांगून हरवलेल्या मुलाचा शोध घेण्यास कळविले. त्यावरून पोलीस ठाणे शिवाजी नगर येथील अधिकारी/अंमलदार यांनी हरवलेल्या मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली.पेट्रोलिंग ड्युटीवर असलेले पोलीस अमलदार श्री.देवकते यांना ठाणे अंमलदार यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे एक मुलगा शिवाजी चौकात मिळून आला त्यावर श्री.देवकते यांनी त्या मुलास सोबत घेऊन पोलीस ठाणेला आले व मुलास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तो मुलगा रुद्र शिवकुमार छत्रबंद असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे नातू हरवल्याची तक्रार देण्यास आलेल्या मुलाची आजी यांना पोलीस स्टेशनला बोलावून घेऊन मिळून आलेल्या लहान मुलगा रुद्र शिवकुमार छत्रबंद याला त्याच्या आजीच्या ताब्यात देण्यात आले.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे 1 तासातच हरवलेला लहान मुलगा मिळून आल्याने पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक श्री.हिम्मत जाधव यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.सुनीलकुमार पुजारी, पोलीस ठाणे अंमलदार श्री.गारोळे ,पोलीस अंमलदार श्री.देवकते यांचे अभिनंदन केले आहे.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.