अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यास सरकार अपयशी - उत्तरेश्वर कांबळे
*लातुर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त* *कु, समीक्षा* *गायकवाड हिच्या कुटुंबाचे सांत्वनपर** भिम आर्मीची*भेट*
लातुर प्रतिनिधी:लक्ष्मण कांबळे
महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमाती च्या लोकांवर अन्याय अत्याचार तसेच महिला व मुलींची छेडछाड, विनयभंग, बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत.ते रोखण्यासाठी
सरकार मात्र सपशेल अपयशी ठरत आहे.असे भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे म्हणाले ते
लातुर जिल्ह्यातील तळणी येथे आत्महत्याग्रस्त कु.समीक्षा गायकवाड हिच्या कुटूंबाचे सांत्वन करण्यासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलताना म्हणाले की.
महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचे खुन पाडले जात आहेत.महिला ,मुलींची छेड काढली जात आहे , बलात्कार केले जातात प्रशासनाला त्याचे गांभीर्य नाही. त्यांच्यासमवेत महाराष्ट्र संघटक अक्षय धावारे , मराठवाडा उपाध्यक्ष विनोद कोल्हे , जिल्हाप्रमुख विलास आण्णा चक्रे , लातूर जि.संघटक सुभाष बनसोडे, बार्शी ता.अध्यक्ष शरद बनसोडे , प्रसिद्धी प्रमुख कार्तीक गायकवाड, रेणापुर ता. आध्यक्ष अमर गुरव , जि. सचिव शिवाजी लांडगे , शहर महासचिव बबलु गवळी , रेणापूर ता.संघटक अमीत कांबळे संदीप कांबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.नराधम आरोपी ईश्वर कन्हेरे याला कठोर कार्यवाही प्रशासनाने करावी पिडीत
कुटुंबा सोबत भीम आर्मी खंबीरपणे सोबत आहे अशी ग्वाही उत्तरेश्वर कांबळेंनी दिली.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.